मुंबई (वृत्तसंस्था) महिंद्रा उद्योग समूहाने लष्करात चार वर्षांच्या सेवेनंतर ‘अग्निवीरांच्या’ भरतीची घोषणा केली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ‘अग्निपथ’ (Agneepath Scheme) योजनेवरून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. यासोबतच त्यांनी अग्निवीरांना मिळालेले प्रशिक्षण विशेष असल्याचे सांगितले आहे.
देशभरात गदारोळ सुरू असताना महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सोमवारी प्रशिक्षित आणि पात्र अग्निवीरांच्या भरतीची घोषणा केली. आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलं की, ‘अग्निपथ योजनेवरून झालेल्या हिंसाचारामुळे मी दु:खी आहे. गेल्या वर्षी जेव्हा ही योजना आणली गेली तेव्हा मी म्हणालो होतो आणि मी पुन्हा सांगतो की अग्निवीरांची शिस्त आणि कौशल्य त्यांना रोजगारक्षम बनवेल.
अग्निवीरांना नोकरीची ऑफर
महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केले की, “अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर होत असलेल्या हिंसाचारामुळे मी अत्यंत दु:खी आणि निराश झालो आहे. गेल्या वर्षी, जेव्हा या योजनेचा विचार केला जात होता, तेव्हा मी म्हटले होते की अग्निवीरांना मिळणारी शिस्त आणि कौशल्य त्याला नक्कीच रोजगारक्षम बनवेल. त्यांनी पुढे लिहिले की, महिंद्रा ग्रुप अशा प्रशिक्षित आणि सक्षम तरुणांना येथे नोकरीची संधी देईल.