पिंप्री ता. धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव रोडवरील जोगेश्वरी जिनिंगला आज सायंकाळी भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात अधिक असे की, धरणगाव रोडवरील जोगेश्वरी जिनिंगला आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत जिनिंगमधील मका, कपाशी आणि इतर वस्तू जाळून खाक झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर आग विझविण्यासाठी धरणगाव आणि एरंडोल येथील अग्निशमन बंब मागविण्यात आले होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आग विझवण्याचे काम सुरूच होते.