TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘ईईएसएल’, ‘महावितरण’सह ‘मनपा’ विद्युत विभागाची महापौर दालनात संयुक्त बैठक

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आज महापौर दालनात उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी व महापालिका विद्युत समिती सभापती पार्वताबाई भिल यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या विद्युत विभागासह ‘ईईएसएल’, ‘महावितरण’ व ‘ईईएसएल’ने नियुक्त केलेले वेंडर यांची संयुक्त बैठक घेतली.

गेल्या दोन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात शहरातील रस्त्यांवरील खांबांवर लावलेले पूर्वीचे सीएफएल लाईट काढून त्या जागेवर नवीन एलईडी लाईट लावण्याचे आदेश राज्यातील सर्व नगरपरिषदा, महापालिकांना देण्यात आले होते. त्यानुसार शासनाच्या आदेशीत ईईएसएल या कंपनीकडून जळगाव शहरात एलईडी लाईट लावण्यात आले. त्या लावलेल्या लाईटची मेंटेनन्सची जबाबदारी ही करारनाम्यातील अटीनुसार सात वर्षांच्या करारावर कंपनीकडून लेखी स्वरूपात ठरली आहे. सुरूवातीला लाईट लावताच शहरात झगमगाट दिसत होता. परंतु पूर्णपणे लाईट लागल्यानंतर काही दिवसांतच सदरचे काही लाईट हे बंद झाले. तसेच काही ठिकाणी दिवसा सुरू तर रात्री बंद अशी या लाईटची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे सतत नागरिकांकडून यासंदर्भात तक्रारी वाढत असताना सदर बंद लाईटबाबत महापालिकेने स्थापन केलेल्या ‘महापौर सेवा कक्ष’सह नगरसेवकांकडूनही महापौर, उपमहापौरांकडे सातत्याने तक्रारी येत आहेत. याची गंभीरतेने दखल घेऊन महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आज गुरुवार, दि. १७ जून २०२१ रोजी आपल्या दालनात उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी व महापालिका विद्युत समिती सभापती पार्वताबाई भिल यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या विद्युत विभागासह ‘ईईएसएल’, ‘महावितरण’ व ‘ईईएसएल’ने नियुक्त केलेले वेंडर यांची संयुक्त बैठक घेतली.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

त्यात महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी सर्वांकडून विजेसंदर्भातील सर्वच विषयांवर विस्तृत चर्चा केली. त्यात ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा करून काही विषय मार्गी लावण्याची भूमिका मांडली गेली, तर ‘ईईएसएल’च्या अधिकार्‍यांना धारेवर धरत शहरातील ज्या खांबांवर लाईट नाही तेथे तत्काळ एलईडी लाईट लावावेत. हे काम ३० जून २०२१ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे. तसेच संबंधित लाईटची चाचणी घेण्यासह मेंटेनन्सचे कामही तत्काळ सुरू करावे, अशी सूचना केली. यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाचे आपणास संपूर्णपणे सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली.

‘ईईएसएल’चे अधिकारी प्रसाद गांगोळे, ‘महावितरण’च्या रत्ना पाटील व धीरज बारापात्रे, ‘ईईएसएल’चे वेंडर यादव, महापालिका विद्युत विभागप्रमुख एस.एस. पाटील, सहाय्यक अभियंता विलास पाटील, शिंपी, युवराज मेढे, कमलाकर राणे, राधाकृष्ण बोरोले, मिलिंद बेंडाळे आदी यावेळी उपस्थित होते.

महापौर जयश्री सुनिल महाजन गेल्या मार्चमध्ये पदभार स्वीकारल्यापासून शहरात विविध तक्रारींच्या अनुषंगाने पाहणी दौरा करीत आहेत. यात त्यांच्यासमवेत चर्चेवेळी, ‘महापौर सेवा कक्ष’च्या माध्यमातून तसेच नगरसेवकांकडून प्राप्त अशा शहरातील पथदिव्यांच्या संदर्भातील तक्रारींचा पाढा सातत्याने वाचला जात होता. त्या अनुषंगाने आज त्यांनी आपल्या दालनात उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी व महापालिका विद्युत समिती सभापती पार्वताबाई भिल यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या विद्युत विभागासह ‘ईईएसएल’, ‘महावितरण’ व ‘ईईएसएल’ने नियुक्त केलेले वेंडर यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत ‘ईईएसएल’ने सर्वेक्षणाच्या आधारे शहरातील खांबांवर जवळपास १५ हजार ५०० एलईडी लाईट लावल्याचे सांगून अलीकडच्या काळातही काही वाढीव वस्त्यांच्या ठिकाणच्या खांबांवरही एलईडी लाईट लावण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे आम्हाला आता काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र द्या, अशी मागणी केली. त्यावर महापौर, उपमहापौर व आयुक्तांनी त्यांना धारेवर धरत अनेक खांबांवरील लाईट बंदावस्थेत आहेत, ते का बंद आहेत याची चौकशी करा आणि नव्याने लाईट लावा. काही ठिकाणचे लाईट दिवसा, तर काही ठिकाणी रात्री लाईट सुरू असतात. त्याचे कारण तुम्ही मेंटेनन्स काहीही केलेले नाही. त्यामुळे येत्या ३० जूनपर्यंत शहरासह स्लम एरियातील सर्व खांबांवर लाईट लागले पाहिजेत, मेंटेनन्सचे कामही तत्काळ सुरू करावे तसेच ‘सीसीएमएस’चेही कामही सुरू करावे. जोपर्यंत संपूर्ण काम चोखपणे पूर्ण होऊन त्याचे मेंटेनन्स सुरू होत नाही तोपर्यंत तुम्हाला काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार नाही. आज सांगितलेल्या कामांची पूर्तता झाली किंवा नाही, याचा आठवडाभरात आढावा घेऊ.

याचवेळी ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांना महापौर, उपमहापौर व आयुक्तांनी शहरातील वाकलेले खांब, रस्त्याच्या मधोमध, गटारींमध्ये उभे असलेले खांब काढून ते दुसर्‍या जागेत हलवावेत, त्याचप्रमाणे रस्त्याच्या मधोमध येणारे ट्रान्स्फॉर्मर (डीपी) हटविले जावेत, अशी मागणी करून यासाठी सहकार्याची भूमिका घेत मेहरुणमध्ये ‘अमृत’ योजनेचे काम सुरू आहे. तेथे तीन ठिकाणचे वीजखांब शिफ्टिंग करणे बाकी आहे. यासंदर्भात इस्टिमेटही मंजूर केले आहे. मात्र ‘महावितरण’कडून कार्यवाही नाही, ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांनी सकारात्मकता दाखवत तुम्ही आम्हाला चर्चेतील सर्व विषय लेखी स्वरूपात दिल्यास आम्ही नक्की तुम्हाला ही कामे मार्गी लावण्यासंदर्भात सहकार्य करू, यासाठी निधीची तरतूद करा, असे सांगत आश्वस्त करून सध्या शहरातील ३१७ उभे अनावश्यक खांब काढणे सुरू असल्याचे सांगितले.

महापालिकेच्या विद्युत विभागप्रमुखांनीही शहरात लाईट लावण्यासंदर्भात आम्ही १६ हजार खांबांचे सर्वेक्षण केले असून, जवळपास ४ हजार ८०० खांबांवर एलईडी लाईट नाहीत. सद्यःस्थितीत एकूण ६ हजार ५०० खांबांवर एलईडी लाईट बसविणे गरजेचे आहे. यात स्लम एरियासह शहरातील वाढीव भागांत पथदिव्यांसंदर्भात काहीही नियोजन नसल्याचे सांगत ‘महावितरण’ने सोयीनुसार ग्राहकांना वीज कनेक्शन दिल्यामुळे पथदिव्यांच्या खांबांच्या ठिकाणी शॉर्टसर्किटसारखे प्रकार घडतात. त्यासाठी मदत करावी, आम्ही आपणास सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २१ जून रोजी ऑनलाईन आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो ?

December 4, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार २४ ऑगस्ट २०२२ !

August 24, 2022

जळगावात ६१ वर्षीय वृद्धाने केला महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल !

October 16, 2022

आता ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार रिंगणात

January 3, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group