कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) बुलडाणा अर्बन बँक शाखा कासोदा तर्फे दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त कासोदा येथील पत्रकारांच्या सत्कार करण्यात आला
या प्रसंगी केदारनाथ सोमाणी, जितेंद्र ठाकरे, प्रशांत सोनार, प्रमोद पाटील, चीलाणेकर, नुरुद्दीन मुल्ला उपस्थित होते. यांचा सत्कार व्यवस्थापक अनिल सोळंके यांनी केले. तसेच सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नुरुद्दीन मुल्ला यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्रच्या वतीने मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाच्या आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपस्थित पत्रकारांनी व व्यवस्थापक सर्व कर्मचाऱ्यांनी मुल्ला यांचे अभिनंदन केले.