मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अशात आता कंगनानं एक नवा दावा केला आहे. तिचं आता असं म्हणणं आहे की, श्रीदेवीनंतर विनोदी भूमिका सातत्याने साकारणारी ती बॉलीवूड मधली केवळ दुसरी अभिनेत्री आहे. असं म्हणत तिने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींशी कंगनाने स्वःताची तुलना केली. तिच्या या ट्वीटनंतर अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनाने आपलं मत व्यक्त करत असते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. कंगनाच्या ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाला आज १० वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने कंगनाने एक नवं वक्तव्य केलं असून तिने स्वत:ची तुलना दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींशी केली. एवढचं नव्हेतर ‘तनु वेड्स मनु’चे लेखक-दिग्दर्शक हिमांशू शर्मा आणि आनंद एल राय यांनी तीने संघर्ष करणारे निर्माते म्हटलं आहे.
कंगना एका नेटकऱ्याचे ट्विट रिट्विट करत म्हणाली की,कंगना ट्विट करत म्हणाली, “सुरुवातीच्या काळात मी ठोकळेबाज भूमिकांमध्ये अडकून पडले होते. पण तनू वेड्स मनू या चित्रपटाने माझ्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीला नवी दिशा दिली. या चित्रपटामुळे मोठ्या पडद्यावर माझी विनोदी अभिनेत्री म्हणून एण्ट्री झाली. तनू वेड्स मनू पासून सुरू झालेला विनोदी भूमिकांचा प्रवास क्वीनमुळे अधिकच बहरला, गेली १० वर्षे मी विनोदी भूमिका साकारत आहे. श्रीदेवीनंतर विनोदी भूमिका सातत्याने साकारणारी मी बॉलीवूड मधली केवळ दुसरी अभिनेत्री आहे! #10yearsoftanuwedsmanu” हा हॅश टॅग देखील वापरला. असं म्हणत तिने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींशी कंगनाने स्वःताची तुलना केली.
आणखी एक ट्विट करत कंगना म्हणाली, “या चित्रपटासाठी आनंद एल राय आणि लेखक हिमांशू शर्मा यांचे आभार. जेव्हा ते बॉलिवूड मध्ये स्ट्रगल करत होते तेव्हा ते निर्माते म्हणून माझ्याकडे आले. मला तेव्हा वाटले की मी त्यांच्यासोबत काम केले तर त्यांनाही फायदा होऊ शकतो. पण याउलट त्यांच्यामुळे माझेच करिअर बहरले. त्यामुळे कोणीच सांगू शकत नाही की कोणत्या चित्रपटाला लोकप्रियता मिळेल आणि कोणत्या चित्रपटाला नाही. सगळं काही नशीबामुळे असतं. माझ्या नशीबात तुम्ही होतात याचा मला आनंद आहे.” अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले.
तत्पूर्वी, कंगनाने तिची तुलना हाॅलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटसोबत केली होती. संपूर्ण जगात अन्य कोणतीही अभिनेत्री तिच्यासारखी नसल्याचा दावा कंगनाने होता. तिच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास , कंगना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे.