TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कान्ह ललित कला केंद्राची एनएसडीत धडक वैभव मावळे लिखित अन् दिग्दर्शित प्रतिशोध हिंदी नाटकाची आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव भारंगममध्ये निवड

vijay waghmare by vijay waghmare
January 4, 2025
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव – येथील केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र, जळगाव यांचे वैभव मावळे लिखित आणि दिग्दर्शित प्रतिशोध या हिंदी नाटकाचे राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी), नवी दिल्लीअंतर्गत होणार्‍या भारंगम या आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली आहे. 28 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणार्‍या महोत्सवात 4 फेब्रुवारी रोजी प्रतिशोध हे हिंदी नाटक सादर होणार आहे. दरम्यान संपूर्ण खान्देशातून केवळ केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र या संस्थेच्या नाटकाची निवड झाली असल्याने लेखक-दिग्दर्शक वैभव मावळे यांच्यासोबत संपूर्ण चमूवर रंगकर्मीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यासाठी कान्ह ललित कला केंंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, प्राचार्य एस. एन. भारंबे अन् केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार जी. बेंडाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी), नवी दिल्ली हे दरवर्षी भारंगम या नाट्य महोत्सवाचे आयोजन करीत असते. या नाट्य महोत्सवात महाराष्ट्र आणि भारतभरातून नाटकांचे सादरीकरण होत असते. दरम्यान, या आंतरराष्ट्रीय महोत्सवात परदेशातूनही नाटके होत असल्याने या महोत्सवाचे एक वेगळे प्रस्थ बनलेले आहे. याचा एक भाग म्हणून वैभव मावळे लिखित आणि दिग्दर्शित प्रतिशोध या नाटकाचे सादरीकरण होणार असल्याने संपूर्ण खान्देशात केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्राने मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. हेमंत पाटील, दिनेश माळी यांनी मार्गदर्शन केले असून यासाठी किरणकुमार अडकमोल, सुदर्शन पाटील, सचिन महाजन, प्रा. प्रसाद देसाई यांनी परिश्रम घेतले आहेत.

READ ALSO

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

या देशांचे होणार सादरीकरण –
या महोत्सवात जर्मनी, स्पेन, तैवान, श्रीलंका, पोलंड, ऑस्ट्रिया, नेपाळ या देशांचे सादरीकरण होणार असून यात भारतभरातून ओडिसा, कर्नाटक, नवी दिल्ली, मणिपूर, आसाम, बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुवाहाटी, पंजाब, गोवा, तेलंगणा, पटना, केरळ आणि जम्मू काश्मिर येथील नाटकेही सादर होणार आहेत.

या कलाकारांची उपस्थिती –

लोकेश मोरे, यश चौधरी, विश्वजीत कोळी, यश कल्याणी, सचिन सोनवणे, गोपाल मोरे, उमेश चव्हाण, नैना अग्रवाल, ज्योती पाटील, अश्विनी बेलेकर, हिमानी कोळी, हिमानी महाजन, धनश्री शिंपी, सिद्धी कुलकर्णी, जयेश वाणी, सिद्धांत सोनवणे हे विद्यार्थी या नाटकात काम करणार आहेत.

  • राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्लीअंतर्गत भारंगम या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र, जळगाव येथील नाटकाची निवड झाल्याने मनस्वी आनंद होत आहे. कान्ह ललित कला केंद्राची ही विजयाची पताका अशीच फडकत राहत असल्याने यामुळे खान्देशात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
    शशिकांत वडोदकर, संचालक कान्ह ललित कला केंद्र, जळगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
Next Post

समाज कल्याण विभाग, अधिकारी व कर्मचारी यांच्या नाशिक विभागांच्या क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ ‌..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरारी फाऊंडेशन कोविड केअर सेंटरमधून ८० वर्षाच्या आजीसह दहा रुग्णांना डिस्चार्ज !

September 22, 2020

ब्रेकिंग न्यूज : चाळीसगावात गुटख्यानंतर आता गांजाचीही तस्करी उघड! पोलिसांकडून १५ लाखांचा ऐवज जप्त !

July 17, 2025

गेल्या 24 तासांत देशात 43 हजार 733 नव्या कोरोना रुग्णांची नोंद !

July 7, 2021

एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, : अतुल भातखळकर

April 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group