बंगळुरु (वृत्तसंस्था) कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सकाळी ११.३० वाजता छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरुन अभिनेता राजकुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा जीव वाचावा म्हणून डॉक्टर प्रयत्नांची पराकष्ठा करत होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली. बंगळुरुच्या विक्रम रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पुनीत राजकुमार हा ४६ वर्षांचा होता. तो ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचा पुत्र होता. पुनीतने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. १९८५ मध्ये तो ‘बेट्टाडा होवू’ चित्रपटात दिसला होता. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. यासोबतच त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘सुवरत्थान’ या चित्रपटात ते अखेरचे दिसले होते. त्याच फिल्मसाठी त्यांची खूप वाहवा झाली होती. ‘सुवरत्थान’ या चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला होता.