मुंबई (वृत्तसंस्था) सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंढे यांच्याबरोबर परस्पर सहमतीने संबंध असलेल्या करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे या दोघांवर पुण्यातील (Pune) येरवडा पोलिसात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणी येरवड्यातील महिलेने फिर्याद दिली होती. अखेर पोलिसांनी कारवाई करत करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे यांना अटक केली आहे.
अजयकुमार देडे व करुणा शर्मा यांनी शस्त्राचा धाक दाखवून महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच महिलेला घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या प्रकरणात करुणा शर्मा यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. आज दुपारी पुणे कोर्टात या दोघांना हजर करण्यात येणार आहे.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी वैयक्तीक आरोप केल्यानंतर शर्मा यांचे नाव पुढे आले होते. शर्मा यांच्यावर तक्रारदार महिलेवर जातीय टिप्पणी केल्याचा आणि हॉकी स्टिकने धमकावल्याचा आरोप आहे. तसेच या प्रकरणावरून फिर्यादीचा पती तिचा छळ करत होता. मी करुणासोबत लग्न करणार आहे, तू मला घटस्फोट दे असे सांगून फिर्यादी महिलेच्या पतीने तिला माहेरी सोडले होते. फिर्यादी महिला आणि तिचा पती हे मूळचे उस्मानाबाद येथील असल्याची माहिती समोर आली आहे. २०११ च्या नोव्हेंबर अजयकुमार देडे आणि करुणा शर्मा यांची ओळख झाली होती. यानंतर अजयकुमार वारंवार करुणा शर्मा यांच्या संपर्कात राहू लागला. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. पती सतत करुणा शर्मा यांच्याशी बोलत असल्याने महिलेने याबाबत विचारले असता, त्याने करुणा शर्मा यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. असे महिलेने फिर्यादी मध्ये म्हटले आहे.