बीड (वृत्तसंस्था) करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना आज न्यायालयात दाखल केलं. कोर्टानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तर त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी आज करुणा शर्मा यांना कोर्टात दाखल केलं होतं. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ड्रायव्हरला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.
करुणा शर्मा यांनीच मांडली स्वतःची बाजू
न्यायालयात हजर केल्यानंतर करुणा शर्मा यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी परळी पोलिसांनी मागितली होती. यावेळी करुणा शर्मा यांनी स्वतः आपली बाजू कोर्टासमोर मांडली. सुरुवातीला त्यांना मराठी मध्ये लिहिलेला मजकूर समजला नाही. त्यामुळे त्यांनी ही माहिती हिंदी मधून सांगण्यात यावी अशी मागणी केली. या प्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने सहा. सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर, करुणा शर्मा यांचे वकील पोहोचू न शकल्याने न्यायालयासमोर त्या स्वतःच स्वतःची बाजू मांडली.
दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. मी तपासकार्यात सहकार्य करण्यास तयार असून मला जामीन द्यावा, असं शर्मा यांनी कोर्टाला स्पष्ट केलं आहे.
नेमकं काय घडलं?
शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.
















