पातोंडा (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप श्रीराम बिरारी यांनी किर्तन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सायंकाळी पाच ते सहा वाजता या वेळेत किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच हा कार्यक्रम चोपड़ा अमळनेर या ठिकाणी बस्थानकजवळ होणार आहे.
संदीप बिरारी यांचे पातोंडा गावा साठी सामाजिक क्षेत्रात असो किवा वेगवेगळ्या क्षेत्रात असो आपले योगदान देत असतात कोरोना माहामारी संकटात त्यांनी गरजु लाभार्थी साठी रेशन किट वाटप केले होते. तसेच पातोंडा परिसर विकास मंच या ठिकाणी त्यांनी वॄक्ष रोपण साठी फवारणी औषधी व गावातील परिसरातील त्यांनी सामाजिक कार्यात ते आपले योगदान देत असतात. किर्तनाचे आयोजन त्यांनी केले असुन तसेच पातोंडा येथील गावातील प्रत्येक तरुण गटा कड़े वेगवेगळ्या जबाबदारी दिली आहे. तसेच काही तरुणांकडे स्वासयंकची जबाबदारी दिली आहे. परिसरातील नागरिकांनी किर्तनाचा लाभ घ्यावा तसेच या कार्यक्रमाला तालुक्यातील प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.