मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी बुधवारी (दि.२१) ईडी( सक्तवसुली संचलनालय) कडून १५ ते १६ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या छापेमारीत तत्कालीन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह ठाकरे गटाशी निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण यांचाही समावेश होता. आता या छापेमारीत ईडीच्या हाती लागले 150 कोटींच्या मालमत्तेचे कागदपत्रे, 15 कोटीची एफडी, 68 लाख रोख रक्कम तर इतर 1 कोटी 82 लाखांचे सोन्याचे दागिने असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस हॉस्पिटलच्या टेंडर बोलीच्या वेळी संजीव जैयस्वाल अतिरिक्त महापालिका आयुक्त होते आणि महत्त्वाचं म्हणजे स्थापन करण्यात आलेल्या समितीचा भाग होते. ज्यांनी लाईफलाईन हॉस्पिटलला मॅनेजमेन्ट सर्व्हिसेस कंपनीला टेंडर दिलं. टेंडर प्रक्रियेवेळी ज्या कंपनीला हे कंत्राट द्यायचं आहे, त्या कंपनीकडे पूर्वीचा अनुभव आणि पात्रता याचा विचार करून एक कंत्राट देणं क्रमप्राप्त होतं. मात्र तपासात या कंपनीला पुरेसा अनुभव नसताना शिवाय या कंपनीकडे रुग्णसेवेसाठी पुरेशी मनुष्यबळ आणि साहित्य उपलब्ध नसतानासुद्धा या कंपनीला कंत्राट देण्यात आलं. संजीव जैयस्वाल यांनी असं असतानासुद्धा या कंपनीला कंत्राट का दिलं? याची ईडीकडून कसून चौकशी करत आहे. संजीव जैयस्वाल यांच्याशी काही इतर महानगर पालिका अधिकारी यांच्या घरीसुद्धा छापेमारी करण्यात आली आहे.
कोविड मृतदेहासाठीच्या बॅग्स 2 हजार रूपयांत एक कंपनी देत असताना, बीएमसीला सप्लाय करणाऱ्या कंपनीने मात्र 6 हजार 800 रुपयाला विकले. हे कंत्राट महापौरांच्या सांगण्यावरून देण्यात आलं. कोविडच्या उपचारांमधली औषधे बीएमसीला ज्या दरांमध्ये मिळत होती, त्याच्या 25-30 टक्के कमी दराने ती बाजारात उपलब्ध होती. हे लक्षात आणून दिल्यानंतरही BMC च्या अधिकाऱ्यांनी पावलं उचलली नाहीत. बीएमसीला बिलामध्ये जेवढं दाखवण्यात आलं त्यापेक्षा 60-65 टक्क्यांपेक्षा कमी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते.
कंपनी अशा डॉक्टरांची नावं बिलामध्ये दाखवत होती, जे डॉक्टर्स काम करतच नव्हते. पण भासवण्यात असं आलं की ते लाईफलाईन जम्बो कोविड सेंटमध्ये काम करत आहेत. 21 जूनला टाकलेल्या धाडीत 68.65 कोटींची रोख रक्कम, महाराष्ट्रातल्या 50 स्थावर मालमत्तांबाबतची कागदपत्रं ज्याची किंमत 150 कोटींहून अधिक आहे. 15 कोटींचे FD/गुंतवणुकीची कागदपत्रं 2.46 कोटींचे दागिने याशिवाय इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, मोबाईल फोन, लॅपटॉप आदी गोष्टी जप्त करण्यात आल्याचे कळते.