अमळनेर (प्रतिनिधी) येथील जी.एस. हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतांना सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल सविस्तर अशी माहिती सांगितली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक आर एल माळी यांनी स्विकारले.तसेच शाळेचे मुख्याध्यापक डी एच ठाकुर,पर्यवेक्षक एस बी निकम उपस्थित होते.ज्येष्ठ शिक्षक के पी पाटील,वाय आर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच शिक्षक शिक्षकेतर बंधु उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.एन. साळुंखे यांनी तर आभारप्रदर्शन राहुल बहिरम यांनी केले.