पहुर ता. जामनेर (प्रतिनिधी) वीटभट्टी मालकाकडून झालेल्या मारहाणीत मजुराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लहानू तडवी व त्याच्या पत्नी मध्ये वाद झाले. त्यावेळी मालक पवार यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मालकाचेही न ऐकल्याने संतप्त झाल्याने पवार यांनी त्यास काठीने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या मागील मेंदूस मार लागल्यामुळे ते जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. लहानू हालचाल करत नसल्याचे पाहून मालक पवार यांनी त्यांना तोंडापूर येथे रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने पवार यांचे भेदरले. यामुळे पवार यांनी मयत लहानू चांदखाँचा मृतदेह पुन्हा वीट भट्टीजवळ आणून ठेवल्याची माहिती मयतांच्या नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी गुरूवारी रात्री उशिरा रात्री उशिरापर्यंत पोलिसांत कुणीही तक्रार दिलेली नसल्याने गुन्हा दाखल नव्हता.
याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पहूर ग्रामीण रुग्णालयात नेला. या घटनेचे गांभीर्य ओळखून वीट भट्टी चालकासह काही समर्थक शुक्रवारी पोलिस ठाण्यात स्वतःहून पोहोचले होते. नातेवाइकांनी शुक्रवारी पहूर ग्रामीण रुग्णालयात गदारोळ घातला. यांनतर लहानू चांदखाँ तडवी याच्या मृत्यूप्रकरणी गोद्री येथील त्याचा चुलत भाऊ शाहरुख रशीद तडवी याने पोलिसांत वीट भट्टी मालक पवारविरुद्ध मारहाण करून जिवे मारण्याची फिर्याद दिल्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.