धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खामखेडा गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महामंडळाची बस पोहोचल्यानंतर गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले होते. यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.
बस सुरु झाल्यामुळे गावकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. वर्षानुवर्षे येथील प्रवाशांना वैयक्तिक व खासगी वाहनांशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे नागरिकांची, विद्यार्थ्यांची मोठी दमछाक होत असे. त्यामुळे लोकनियुक्त सरपंच धिरज पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बस सुरु करण्याबाबत विनंती केली. पालकमंत्र्यांनी महामंडळच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तात्काळ बस सुरु करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार नुकतीच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बससेवा सुरू झाल्याने खामखेडा ग्रामस्थ आणि खास करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे निर्माण झाले. बस गावात आल्यावर ग्रामस्थांनी बस चालक व वाहक यांचा सत्कार केला. तर सरपंच धिरज पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांचे आभार मानले आहे.
बस सुरु झाल्यामुळे आमच्या गावातील एक मोठी समस्य दूर झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नेहमीचा आम्हाला सहकार्य असते. त्यांच्यामुळे परिसरात मोठी विकास कामे सुरु आहेत. आम्ही ग्रामस्थ पालकमंत्री गुलाबराव पाटील, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांचे आभारी आहोत.
– धिरज पाटील, (खामखेडा लोकनियुक्त सरपंच)