धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चांवलखेडा येथील एका वेल्डिंगच्या दुकानातुन अज्ञात चोरट्याने ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात राहुल मधुकर पाटील (वय २४, चांवलखेडा ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २९ मार्च २०२२ रोजी फिर्यादीच्या महेश वेल्डिंग नावाचे दुकानाचे पत्री शेटरचे कुलुप तोडुन जकात कंपनीची एक वेल्डिंग मशीन, युरी कंपनीची 1 कटर मशीन, बॉस कंपनीच्या दोन ड्रिलिंग मशीन, जेसीबी कंपनीचे एक ग्रेंडर मशीन, व्हॉइस मशीन, असा एकूण ४५ हजाराचा मुद्देमाल असे फिर्यादीच्या संमतीवाचुन, लबाडीच्या इराद्याने कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पो.ना जितेंद्र भदाणे करीत आहेत.