अमळनेर (प्रतिनिधी) येथील जिल्हा परीषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ सहाय्यकाला स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधकामाचे बिल मंजुर करण्यासाठी लाच स्वीकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहित असे की, अमळनेर तालुक्यातील खेडी प्र. अ. येथील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदराने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधकाम केले होते. या बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी त्याने जिल्हा परीषद बांधकाम विभागाचे अरूण जगन्नाथ चव्हाण (वय ५७) आणि वरिष्ठ सहाय्यक योगेश बापू बोरसे (वय ४२) यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यानंतर बिल मंजूर करण्यासाठी अरूण चव्हाण यांनी २० हजार तर बिल तयार करण्यासाठी योगेश बोरसे याने पंधराशे रूपयांच्या लाचेची मागणी केली. ही तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथक तयार केले. या पथकाने या दोघांना २० हजार आणि पंधराशे रूपयांची लाच स्वीकारतांना अटक केली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक विजय जाधव, पोलीस उपअधीक्षक गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक निलेश लोधी, सफौ. दिनेशसिंग पाटील, सफौ. सुरेश पाटील, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, पोना. मनोज जोशी, पोना. सुनिल शिरसाठ, पोना. जनार्दन चौधरी, पोकॉ. प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ. ईश्वर धनगर, पोकॉ. प्रदिप पोळ यांच्या पथकाने केली.