TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनसेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांचा प्रचाराचा जोरदार झंजावात सुरू !

जळगाव शहरातील नामांकित डॉक्टरांचा सहभाग !

vijay waghmare by vijay waghmare
November 5, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहराचे अधिकृत उमेदवार डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचाराचा नारळ शाहूनगर येथील तपस्वी हनुमान मंदिरात वाढवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ऍड जयप्रकाश बाविस्कर यांनी शुभारंभ केला.

आजचा दिवस जळगाव शहरातील लोकशाहीच्या महापर्वाचा एक अविस्मरणीय क्षण बघायला मिळाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला जळगावच्या कणखर जनतेचा उसळता प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गल्ली, प्रत्येक वाडी, वस्तीतील जनतेच्या डोळ्यांत आत्मविश्वासाची झळक, आशेची किरणं, आणि महाराष्ट्र नव्या उमेदीने घडवण्याची जिद्द दिसत होती.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

डॉ. अनुज पाटील यांच्या स्वागताला ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले, अनेक बहिणींच्या ओवाळणीतून कौटुंबिक प्रेम दिसलं. सोबत असलेल्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याने लोकांच्या मनात नव्या जोमाची आणि परिवर्तनाच्या आशेची ज्योत प्रज्वलित केली.

जनतेचे हे प्रेम म्हणजे फक्त उमेदवारावरचा विश्वास नसून, ते एक संकल्प आहे. जळगावच्या उज्ज्वल भविष्याचा. प्रत्येकाने आपल्या घरातील प्रश्न मांडले आणि डॉ. पाटील यांनी त्या समस्या आपल्याच घरातील मानून त्यावर तोडगा काढण्याचं वचन दिलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास दाखवणारे नागरिक आपले बांधव आहेत, आणि त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे ही आपली जबाबदारी आहे. बदलाची नवी सकाळ आणण्यासाठी जनतेने दाखवलेला हा भरघोस प्रतिसाद आमचं बळ आहे. त्यांच्या या असीम पाठिंब्याला आम्ही सलाम करतो आणि आश्वासन देतो की, ही लढाई केवळ निवडणुकीची नसून एका नव्या युगाच्या उभारणीसाठीची आहे असे प्रतिपादन डॉ. अनुज पाटील यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अनुज पाटील यांचा आजचा प्रचार दौरा शाहू नगर, जे.डी.सी.सी. बँक कॉलनी, पोलीस परेड ग्राउंड, प्रताप नगर, गिरणा वसाहत, इंडिया गॅरेज परिसर, तुकाराम वाडी, जानकी नगर, गणेश वाडी, भास्कर मार्केट पोलीस मुख्यालय, गणेश नगर, दंगल ग्रस्त कॉलनी या परिसरात झाला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे, महानगरअध्यक्ष किरण तळले, उपमहा नगर अध्यक्ष सतीश सैंदाणे, चेतन पवार, जनहितचे राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगळे, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, साजन पाटील जितेंद्र पाटील, ललित शर्मा, आशुतोष जाधव, यांच्यासह डॉक्टर अनुज पाटील यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMNS candidate Dr. Anuj Patil's campaign is in full swing!

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
Next Post

धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वच्छता पंधरवडानिमित्त विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन !

October 3, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २५ नोव्हेंबर २०२३ !

November 25, 2023

डॉ. हर्षद चव्हाण एम.एस. (जनरल सर्जरी) पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण

September 19, 2020

‘माझ्या सोबत कुठे तरी फिरायला चल’ म्हणत तरुणीचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group