TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याजासह पुर्नगठन करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी बॅंकाच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या सूचना !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ पडला आहे. रावेर मधील दोन महसूल मंडळ वगळता जिल्ह्यातील इतर सर्व महसूल मंडळात दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे‌. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी शेतकऱ्यांकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावू नये. चालू हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह पुर्नगठन करण्यात यावे. अशा स्पष्ट सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे बॅंकांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव प्रांताधिकारी महेश सुधळकर, लीड बॅकेचे मॅनेजर प्रणव झा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक सुनिल पाटील, तसेच जिल्ह्यातील इतर सर्व प्रमुख बॅंकांचे प्रतिनिधी, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, शासनाने पीक कर्जाचे पुर्नगठनासोबत शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसूलीस स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर कृषी पंपाच्या वीज बीलात ३३ टक्के सवलत दिली आहे. शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी दिली आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बॅंकांनी ही शेतकऱ्यांना सहकार्य करावे.

READ ALSO

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विमा भरपाईबाबत बोलतांना‌ पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक विमाचा प्रश्न मिटला असून कंपनीचे दावे फेटाळण्यात येऊन या शेतकऱ्यांना ७१ कोटी ३० भरपाई देण्यास सुरुवात झाली‌ आहे. जिल्ह्यातील ७ तालुक्यातील २७ महसूल मंडळातील १ लाख २५ हजार शेतकऱ्यांना कापूस पीक विमा भरपाईचा लाभ मिळत आहे .

पीक विमा रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यातून कर्जाची वसुलीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर बॅंकांनी शेतकऱ्यांच्या पीक विमा रकमेतून कर्जाची वसूली करू नये. अशा सूचना ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिल्या.

अतिवृष्टी, अवकाळी किंवा पावसाचा खंड यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

काही गावांमध्ये एकत्रीकरण योजना झालेली नाही त्या गावांचे बाबतीत सातबारा हे सर्व्हे नंबरचे आहेत. अशावेळी पीक विमा कंपनी महाराष्ट्र रिमोट सेंसिंग एप्लिकेशन्स सेंटरकडून जो नकाशा बघतात तो गटांचा दिसतो. परंतु सातबारा हे सर्व्हे नंबरचे आहेत. त्यामुळे ते जुळून येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान‌ प्रलंबित राहते. अशा गावांच्या बाबतीत भूमी अभिलेख कडील सर्व्हे नंबरचे नकाशे वापर करता येईल. यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील. अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या कर्जाच्या पुर्नगठन सारख्या सवलतीबाबत गावपातळीवर मेळावे, विशेष शिबीरे घेऊन माहिती पोहचविण्यात यावी. क्रेडिट सोसायटींमध्ये बैठका घेण्यात याव्या. शेतकऱ्यांचे बॅंक पासबुक वरील नाव व आधारकार्ड मधील नावात तफावत असल्यास अशा शेतकऱ्यांसाठी आधार दुरूस्ती कॅम्प घेतले जातील. असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 18, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
Next Post

म्हसावद येथे रेल्वे उड्डाणपूलाऐवजी भुयारी मार्ग उभारणे सोयीचे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन, वाचनालयासोबत शॉपिंग कॉप्लेक्स आले कुठून? ; अॅड. संजय महाजन !

June 26, 2021

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025

सार्वजनिक आरोग्य विभागातील 145 जागांसाठी भरती ; MPSCच्या वेबसाईटला भेट देऊन करा अर्ज !

March 21, 2022

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

November 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group