जळगाव (प्रतिनिधी) जळगाव एलसीबीचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह चौघां अधिका-यांची डीवायएसपीपदी पदोन्नती झाली आहे.
शासन पत्र क्र.रापोसे-0122/ प्र.क्र.33 (भाग 2) पोल 1अ, दि. 2/11/2022 या संदर्भानुसार 3 नोव्हेंबर 2022 रोजी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून हे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव एलसीबीचे प्रमुख पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पो. नि. विजयकुमार ठाकुरवाड, डीएसबीचे पो.नि. बाबासाहेब ठोंबे, शनीपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. दिलीप भागवत या चौघांचा पदोन्नतीच्या यादीत समावेश आहे.