भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील वरणगाव येथे आयुध निर्माणी हे प्रतिबंधित क्षेत्र असून येथे दारू नेण्यास बंदी आहे. तरी देखील आयुध निर्माण कारखान्यात अवैधरित्या दारू आत नेण्यात येत होती. याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल न करून घेतल्याने शेवटी सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.
याबाबत वृत्त असे की, डिसेंबर २०२० मध्ये वरणगाव आयुध निर्माण कारखान्यात युनियनची निवडणूक असतांना युनियनच्या दोघा कर्मचाऱ्यांना अवैधरित्या दारूच्या ३५ बाटल्या आयुध निर्माणी कारखान्यात नेत असतांना गेटवर पकडण्यात आले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी तक्रार केल्यानंतर महा प्रबंधक यांनी त्यांना निलंबित केले. मात्र, याबाबत कोणतीही एफआरआय पोलिसात दाखल केली नाही. आयुध निर्माणी हे प्रतिबंधित क्षेत्र असून येते दारू नेण्यास बंदी आहे. असे असतांना दारू आत नेली जात असल्याने आयुध निर्माणीचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यास जबाबदार असणाऱ्या सुरक्षा विभागाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी खन्ना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.