एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पंचायत समिती यांच्या सहकार्याने कासोदा प्रभागात १४७ स्वयंसहाय्यता समूहांना तीन कोटींचे कर्ज वाटप जागतिक ग्रामीण महिला दिनाचे औचित्य साधून नुकताच संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात सर्वप्रथम स्वागत गीत घेऊन सुरुवात केली. प्रभाग समन्वयक दीक्षा अडकमोल यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन मान्यवरांनी केले. तसेच आलेल्या मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
मेळाव्याप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे सहसंचालक तथा प्रकल्प संचालक मीनल कुटे, जिल्हा मार्केटिक अधिकारी हरेश्वर भोई, पोलीस खात्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे तसेच कासोदा बॅंकर्स अधिकारी राजू शर्मा, ज्ञानेश्वर पाटील, योगेश निघोत, कासोदा ग्रामपंचायतचे बंटी चौधरी व स्वप्नील बियाजी, लोकमतचे वरिष्ठ पत्रकार प्रमोद पाटील, तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाचे गुलाब चव्हाण, महेंद्र सोनवणे, प्रशासकीय सहाय्यक जितेंद्र पाटील, प्रभाग समन्वयक दिशा अडकमोल व उज्वला पाटील तसेच १४७ गटातील महिला उपस्थित होत्या.