TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : ‘त्या’ सर्व संशयितांना २३ तारखेपर्यंत दिलासा ; दुसरा हप्ता भरला !

विशेष सरकारी वकील अँड. प्रवीण चव्हाण यांचा जोरदार युक्तिवाद सुरूच !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील ‘त्या’ अकरा संशयितांना न्यायालयाने २३ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन वाढवून दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या सर्व संशयितांनी ठरल्याप्रमाणे न्यायालयात दुसऱ्या हप्त्याची रक्कम देखील जमा केली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अँड. प्रवीण चव्हाण यांनी दिली आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटीत गैरकारभार तसेच फसणुकीबाबत फिर्यादी रंजना खंडेराव घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420, 464, 465, 468,471,474,120 ब, 34 सह एमपीआयडी ऍक्ट कलम 3 अन्वये 24 नोव्हेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल झाला होता.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने 17 जून रोजी जळगाव जिल्ह्यातील भागवत भंगाळे, प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला तिन्ही रा. जळगाव, जयश्री शैलेश मणीयार रा. पाळधी, जयश्री अंतिम तोतला रा. मुंबई, जितेंद्र रमेश पाटील रा. जामनेर, आसिफ मुन्ना तेली रा. भुसावळ, छगन शामराव झाल्टे रा. जामनेर, राजेश शांतीलाल लोढा रा. तळेगाव ता. जामनेर, यांच्यासह प्रितेश चंपालाल जैन रा. धुळे, अंबादास आबाजी मानकापे रा. औरंगाबाद या 11 जणांना अटक केली होती.

कोर्टात भरले होते ३ कोटी १३ लाख !

या ११ संशयितांना पुणे विशेष न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करतांना संशयितांना मॅच केलेल्या पावत्यांची एकूण २० टक्के रक्कम भरण्याची प्रमुख अट घातली होती. त्यानुसार सर्व संशयितांनी त्यावेळी न्यायालयात एकूण ३ कोटी १३ लाख १७ हजार ६८३ रुपये भरले होते.

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १७ जून रोजी ११ जणांना अटक केली होती. सर्व संशयितांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सुनावणी होऊन विशेष न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार १५ आॅक्टोबर २०२१ पर्यंत परतफेड करायच्या ४० टक्के रकमेपैकी २० टक्के रक्कम १० दिवसांत जमा करण्याची प्रमुख अट होती. या अटींनुसार सर्वांनी पैसे भरले होते.

कोणी भरले किती पैसे होते

जयश्री तोतला (२९ लाख ३३ हजार ५९४ रुपये), अंबादास मानकापे (५४ लाख २३ हजार ३२८ रुपये), संजय तोतला (२० लाख ५८ हजार ७३४ रुपये), राजेश लोढा (२६ लाख २८ हजार९१२ रुपये), आसिफ तेली (२२ लाख ४२ हजार ४२५ रुपये), जयश्री मणियार (१७ लाख ९३ हजार ४१२ रुपये), प्रीतेश जैन (३० लाख २१ हजार ९९० रुपये), छगन झाल्टे (३४ लाख ३५ हजार ९९८ रुपये), जितेंद्र पाटील (१३ लाख ५१ हजार २९० रुपये), भागवत भंगाळे (२१ लाख ८ हजार), प्रेमनारायण कोकटा (४३ लाख २० हजार), असे सर्व संशयितांनी न्यायालयात एकूण ३ कोटी १३ लाख १७ हजार ६८३ रुपये भरले होते.

दरम्यान, बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात पुन्हा या संशयितांनी ठरल्याप्रमाणे दुसरा हप्ता भरला आहे. त्यामुळे त्यांना 23 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस स्थानकात हजेरी लावण्याच्या अटीपासून न्यायालयाने शिथिलता दिली असल्याचे कळते. दरम्यान, या प्रकरणात विशेष सरकारी वकील अँड. प्रवीण चव्हाण यांचा जोरदार युक्तिवाद सुरूच आहे.

अकाउंट डिफ्रीझ होण्यापासून तूर्त दिलासा नाहीच

न्यायालयात सुनील झंवरच्या परिवारातील तीन सदस्यांनी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने फ्रिज केलेले अकाउंट डीफ्रिज करण्यात यावे अर्थात खुले करण्यात यावे, या संदर्भात अर्ज दाखल केला होता. परंतु, यावर आज सुनवाई होऊ शकली नाही. या तिघा अर्जांवर 23 ऑक्टोबर रोजीच सुनवाई होणार असल्याचे देखील कळते.

न्यायालयात बहुतांश संशयित आरोपींची हजेरी

बीएचआर घोटाळ्यातील दुसऱ्या सत्रात अटक केलेल्या 11 संशयित आरोपीपैकी आज पुणे विशेष न्यायालयातील एस.एस. गोसावी यांच्या कोर्टात आज बहुतांश आरोपींनी हजेरी लावली होती. सकाळी 11 वाजेपासून सर्व जण न्यायालयात हजर होते. तर अंतरिम जामीन वाढवून दिला जाईल की नाही? या चिंतेने अनेकांना घाम फुटल्याचे दिसून येत होते.

विजय वाघमारे
(9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

जिल्हा बँक निवडणूक : १०५ उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्यासाठी गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्व. रतनलालजी बाफना यांना रविवारी भावपुष्प आदरांजली; संभाजीराजे नाट्यगृहात कार्यक्रम

November 21, 2020

जळगाव शहर पोलीस स्थानकाजवळ चोरी; हजारोचा ऐवज लंपास

September 23, 2020

निधी फाऊंडेशन महिलांना करून देणार महत्त्वाची आठवण, पॉकेट कार्डचे अनावरण !

June 6, 2023

धक्कादायक : ‘प्रपोज डे’ला तरुणीकडून मिळाला नकार ; जळगावात तरुणाने कापली हाताची नस !

February 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group