पुणे (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत राहिली तर काही शहरात लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमिवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउनबाबत मोठे विधान केले आहे. ‘राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. ही रुग्णसंख्येत सातत्याने वाढत गेली, तर काही शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल’, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ‘कोरोना रुग्णांची संख्या वाढणे, ही चिंतेची बाब आहे. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि लॉकडाउन लावायचा का, लावला तर कुठे लावायचा, याबाबत निर्णय घेतला जाईल. पण, घाबरण्याचे कारण नाही, लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही. पण, यातही लॉकडाऊन टाळायचा असेल तर जनतेने नियमांचे पालन करायला हवे’, असे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केले.
टोपे पुढे म्हणाले की, राज्यात दररोज सरासरी 3 प्रमाणे आतापर्यंत ४५ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या लागू असलेल्या निर्बंधांचे सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. जे लक्षणविरहीत रुग्ण आहेत, त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे. शिवाय सोसायटीतील सदस्यांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे. संस्थात्मक विलणीकरण वाढवण्यावर भर दिला जात आहे. पुढील तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा उद्देश आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.