पारोळा (प्रतिनिधी) धुळे ते पारोळा या चालत्या बसमधून २ लाख ८ हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दि. ३ डिसेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, आनंदा जग्गनाथ सोनटक्के (वय ३३, वाहतूक निरीक्षक, एसटी महामंडळ, जळगाव) हे दि. ३ डिसेंबर रोजी धुळे ते [पारोळा (बस क्र. एम.एच १४, बीटी ०७३७) ने आपल्या परिवारासह प्रवास करत होते. पारोळा येथे घरी पोहचल्यावर खाकी रंगाची बॅगेला लावलेले कुलुप पाहता तिचे चैनचे रनर तुटलेले होते. बॅग उघडून बघितले असता त्यातील 2 लाख 8 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने नव्हते. त्यामुळे आनंदा सोनटक्के यांची खात्री झाली की, त्यांच्यासोबत बसमध्ये प्रवास करत असलेले चार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेवर बॅग ठेऊन त्यांच्या बँगेमध्ये ठेवलेले दागीने चोरी केले आहेत. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोकॉ. योगेश जाधवा हे करीत आहेत.
















