जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव रस्त्यावर पाळधी गावानजीक असलेल्या महामार्गावर हॉटेल सुगोकी जवळील रात्री 8 वाजेच्या सुमारास लक्झरी पलटी होवून २४ हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या पाळधी येथील निवासस्थानी जात असतांना त्यांना हा अपघात दिसून आला. त्यांनी तत्काळ पलटी झालेल्या लक्झरीमधून जखमी प्रवाश्यांना बाहेर काढत मदतीचा हात देत रुग्णवाहिकेला बोलवून जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. धरणगावकडे जाणाऱ्या महामार्गावर पाळधी गावानजीक असलेल्या सुगोकी हॉटेलजवळील महामार्गावर रात्री 8 वाजेच्या सुमारास एक लक्झरी खड्ड्यामुळे पलटी झाली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या गाड्याचा ताफा थांबवित लक्झरीमधून जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेला पाचारण करीत रुग्णालयात दाखल केले.
अकोला येथून खाजगी बस क्रमांक जीजे १८ बीव्ही ३०४२ ही अहमदाबाद येथे जात होती. प्रवासात धरणगावकडे जाणाऱ्या महामार्गावर पाळधी गावानजीक असलेल्या सुगोकी हॉटेलजवळील महामार्गावर रात्री ८ वाजेच्या सुमारास बस अचानक रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात २४ जण जखमी झाले असून जळगाव जिल्हा रुग्णालयात २२ जखमींना आणण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मदतकार्य करीत आहे.