बोदवड (प्रतिनिधी) भुसावळचे सुप्रसिद्ध जादूगार व अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकारी शामकुमार वासनिक यांच्या विज्ञान व हातचलाखीवर आधारित जादूच्या विविध प्रयोगांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथे राष्ट्रीय विज्ञान सप्ताह उत्साहात साजरा झाला.
संस्थेचे चेअरमन मा.मिठूलालजी अग्रवाल यांच्या प्रोत्साहनातून आणि प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जादूचे विविध प्रयोग व त्या मागील विज्ञानावर आधारित ‘मॅजिक शो’चे आयोजन ‘शास्त्रोत्सव’ मंडळातर्फे नुकतेच करण्यात आले. मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी सुरज गणवीर, उपप्राचार्य डॉ. व्ही पी चौधरी, प्राध्यापक पी. एस. महाले, डॉ. अजय पाटील डॉ. गीता पाटील, नरेंद्र जोशी, डॉ. अनिल बारी , डॉ. चेतनकुमार शर्मा डॉ मनोज निकाळजे ,डॉ. वंदना नंदवे,डॉ वैशाली संसारे, डॉ अमर वाघमोडे डॉ. अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी पाण्याने दिवा पेटवून अनोख्या पद्धतीने सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
चमत्कार प्रशिक्षण व जादूचे प्रयोग याअंतर्गत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मंत्राने दिवा पेटवणे, हवेतून हात फिरवून वस्तू निर्माण करणे, कागदापासून नोट बनवणे इत्यादी विषयावर आधारित प्रयोगांच्या सादरीकरणाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. प्रास्ताविकात डॉ. रुपेश मोरे यांनी भारतीय संविधानानुसार 51- क या कलमानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ,सुधारणावाद विकसित करणे या मूलभूत कर्तव्याची माहिती सांगितली .केवळ काही बुवाबाबा यांचे पितळ उघडे पाडणे एवढय़ाच हेतूने हा कार्यक्रम होत नाही तर चिकित्सक वृत्तीने आपल्या मेंदूची कवाडे खुली करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . समाजात काही भोंदूबाबा ,बुवाबाजी करणारे लोक जादूच्या चमत्कारांचा गैरवापर करून अडाणी व अशिक्षित लोकांना फसवतात. कारण अशिक्षित आणि अडाणी लोकांचा चमत्कारावर विश्वास असतो. म्हणूनच सुशिक्षित लोकांनी कुठलीही भीती न बाळगता चमत्काराला विरोध केला पाहिजे असे आवाहन प्राचार्य अरविंद चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
शास्त्रोत्सव मंडळाचे प्रमुख डॉ. रुपेश मोरे यांनी प्रास्ताविक केले .सौ कांचन दमाडे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. रूपाली तायडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक बाबुराव हिवराळे, शेखरसिंग चव्हाण, वैभव कासार ,समीर पाटील, राजू मापारी ,अतुल पाटील, दिपक जोशी,वैभव माटे, विजय धोबी, यांनी परिश्रम घेतले.