चाळीसगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील शेतकऱ्याची व्यथा जाणून घेणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला असल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्याला दिलासा देण्याचे काम आघाडी सरकारने केले आहे. सर्व सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून शासनाच्या योजना आज सुरू आहेत. त्या शिवसैनिकांनी घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे प्रतिपादन चाळीसगाव तालुक्यातील शिव संपर्क अभियाना प्रसंगी पातोंडा आणि मेहुनबारा येथे आयोजित जाहीर सभेत केले.
याच वेळी पुढे बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका करताना केंद्र सरकारने आतापर्यंत फक्त थापा मारण्याचे काम केले असून तिप्पटीने महागाई वाढवण्याचे पाप केले आहे असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिव संपर्क अभियान राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील शहरी ग्रामीण जनतेपर्यंत शिवसैनिकांनी पोहोचून शिवसेनेचे विचार आचार आणि सरकारची कामगिरी पोहोचवावी असा या अभियानाचा उद्देश आहे. यासाठी जळगाव जिल्हात शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले यांना प्रमुख मार्गदर्शक वक्ता म्हणून जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या बरोबर मुंबई येथील शिवसेनेच्या निरीक्षकांची एक टीम देण्यात आली आहे. शिवसंपर्क अभियानाचे उद्घाटन पातोंडा येथे जाहीर सभेने दुपारी १२ वाजता करण्यात आले असून २ वाजता मेहुणबारे येथे दुसरी सभा घेण्यात आली.
यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल माने, यावल विभागाचे जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील यांची समयोचित भाषणे झाली. व्यासपीठावर शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाणे, धर्मा बापू काळे, संजय संतोष पाटील, तुकाराम पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमास पातोंडा येथील बापू माळी पाटील दिलीप पाटील प्रभाकर पवार रघुनाथ गबा कोळी सावता माळी मेहुणबारे येथे विलास भाई हिंमत निकम ज्ञानेश्वर देवरे आशिष सानप सुरेश पाटील अनिल राठोड उपस्थित होते.
शिवसंपर्क अभियान यशस्वीतेसाठी प्रशांत कुमावत, निलेश गायके, संजय ठाकरे, जावेद शेख, किरण आढाव, हर्षल माळी, सुनील गायकवाड, रॉकी धामणे, रामेश्वर चौधरी, रघुनाथ कोळी, नाना पाटील, चेतन कुमावत, सागर पाटील, नकुल पाटील, प्रतिभा पवार, मनीषा महाजन, काटे ताई, संगीता पाटील, सविता कुमावत, मगन बैरागी, देवचंद साबळे, संजय पाटील, जिभाऊ पाटील यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र सातपुते यांनी केले प्रास्ताविक दिलीप घोरपडे यांनी केले.