TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र ‘हिरक’ महोत्सव : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा’

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. गेल्या ६० वर्षात महाराष्ट्राने विविध क्षेत्रांमध्ये केलेली प्रगती उल्लेखनीय आहे याचेच औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्र आपल्या वैशिष्टयपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिध्द आहे. वैविद्यपूर्ण उपक्रमांच्या श्रृखंलेमध्ये महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत परिचय केंद्राने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा’ आयोजनाचा अभिनव उपक्रम आखला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रासह देश-विदेशात वास्तव्यास असणा-या व मराठी भाषा अवगत असणा-या व्यक्तींनी या उपक्रमात मोठया संख्येने सक्रीय सहभाग देण्याचे आवाहन परिचय केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

‘हिरक’ महोत्सव महाराष्ट्राचा

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हिरक महोत्सवी वर्ष सुरु आहे. स्वातंत्र्य चळवळीत देशाचे नेतृत्व करणा-या महाराष्ट्राने समाजप्रबोधन आणि सामाजिक विकासात केलेले कार्य देशातील अन्य राज्यांसाठी प्रेरणादायी आहे. राज्यातील धुरीणांनी राज्याच्या विकासाचे स्वप्न बाळगून त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी अविरत कष्ट उपसले. सध्या महाराष्ट्र हे देशात उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य असून देशातील सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक राज्यात झाली आहे . देशातील सर्वात चांगल्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात आहेत. राज्यातील सिंचन प्रकल्पांनी शेती विकासाला गती दिली आहे. सहकार चळवळीने राज्याच्या ग्रामीण भागाचे चित्र पालटविले आहे. वंचित उपेक्षित घटकांबरोबर महिला आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्राने अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. महाराष्ट्राने देशाला ‘रोजगार हमी योजना’, ‘माहितीचा अधिकार’ सारखे प्रभावी कार्यक्रम दिले. राज्याने उद्योग, सहकार, ऊर्जा, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात अद्वितीय कार्य केले जे इतर राज्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे. महाराष्ट्राची हीच गौरवशाली पंरपरा महाराष्ट्र गौरव गीतामध्ये प्रतिबिंबीत व्हावी या उद्देशाने परिचय केंद्राने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे नियम व अटी
१) १८ वर्षांवरील मराठी भाषा अवगत असणा-या सर्व नागरीकांस ही स्पर्धा खुली राहील.
२) महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धेसाठी स्पर्धकाला एक व जास्तीत-जास्त दोन स्वरचित गीत पाठवता येतील.
३) महाराष्ट्र गौरव गीत पाठविणा-या स्पर्धकाने त्यांचे गीत ही स्वत:चीच रचना असल्याचे लेखी प्रतिज्ञा पत्र परिचय केंद्रास देणे आवश्यक आहे.
४) पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संमती पत्रही सोबत जोडणे आवश्यक आहे.
५) पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी परिचय केंद्रातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. निवड समितीने घेतलेला निर्णय स्पर्धकांवर बंधनकारक राहील.

या स्पर्धेसाठी १० एप्रिल २०२१ पर्यंत गीत पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्पर्धकाने प्रतिज्ञापत्र आणि संमती पत्रासह आपली गीत रचना महाराष्ट्र परिचय केंद्र, ए-८, स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबा खडकसिंह मार्ग, नवी दिल्ली-११००१.’ या आमच्या कार्यालयाच्या पत्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमध्ये टपालाद्वारे पाठवावी. संबंधित रचना, प्रतिज्ञापत्र व संमतीपत्राची एक प्रत माहितीसाठी आमच्या कार्यालयीन ईमेल micnewdelhi@gmail.com वरही पाठवावी.

परिक्षक मंडळ व पुरस्काराविषयी

या स्पर्धेसाठी प्राप्त गीत रचनेची निवड ही या कार्यालयाद्वारे नेमण्यात आलेल्या साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या एका परिक्षक मंडळाकडून करण्यात येईल. स्पर्धेत पहिल्या तीन ठरणा-या रचनांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. स्पर्धेचा निकाल १ मे २०२१ या महाराष्ट्र दिनी जाहीर कण्यात येईल. पहिल्या तीन उत्तम गीत रचनांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र स्वरुपात पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

जामनेर येथे लॅपटॉप चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सखी वन स्टॉप सेंटर पिडीत महिलांना न्याय व दिलासा देणारे न्यायमंदिर व्हावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

September 29, 2023

अन्यथा बेवारस वाहनाचा कायदेशीर पध्दतीने लिलाव करण्यात येईल ; धरणगाव पोलिसांचे आवाहन !

April 9, 2021

नेहरू युवा केंद्रातर्फे आशा फाउंडेशन संस्थेकडून एचआयव्ही एड्स या विषयावर चित्रकला स्पर्धा उत्साहात !

February 4, 2021

मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलने थांबवण्यासाठीच हा लॉकडाऊन : चंद्रकांत पाटील

May 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group