धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) पंचक तालुका चोपडा येथील कृषी भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी हेमचंद्र पाटील यांच्या शेतातील जैन स्वीट आँरेंज या मोसंबी वाणाची पाहाणी करुन छोट्याशा गावात उत्कृष्ट जैन स्वीट आँरेंज या मोसंबी वाणाची बाग फुलवली असुन शेतकऱ्यासाठी एक आदर्श हेमचंद्र पाटिल यांनी ठेवल्याचे गौरव उद्गगार महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव एकनाथजी डवले यांनी काढले.
सदर फळपिक वाण विषयी माहिती जैन ईरीगेशन जळगावचे शास्त्रज्ञ अनिल ढाके आणि श्रीराम पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजीराव ठाकूर, कृषी उपसंचालक (आत्मा) मधुकर चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर दादाराव जाधवर, तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई, कृषी पर्यवेक्षक सुनील गुजराथी आणि आर.टी.वाल्हे हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत कृषीभुषण हेमचंद्र पाटील आणि देविदास पाटील यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीते साठी कृषी सहाय्यक किशोर महाजन, दिपक पाटील महेंद्र, साळुंखे यांनी सहकार्य केले.