धरणगाव (प्रतिनिधी) येथील सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगावचा इयत्ता १० वीचा १०० टक्के निकाल लागला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करतांना इयत्ता ९ वी चे ५० % गुण, व १० वीची तोंडी परीक्षा, चाचणी परीक्षा या आधारावर मूल्यांकन करण्यात आले.
कु.दिपाली दिलीप नेरकर ही शाळेतून ९४.२० % गुण संपादन करून प्रथम आली. कु.वैशाली गुलाब माळी ही द्वितीय क्रमांकाने ९३.८० % तर कु.रूपाली गोविंदा भोई ही तृतीय क्रमांकाने ९३ % मिळवुन यश संपादन केले. इतर सर्व विद्यार्थांनी देखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थीनींचा तसेच इतर शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने मनस्वी अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी सुवर्ण महोत्सवी शाळेच्या मुख्याध्यापिका पी.आर.सोनवणे, पर्यवेक्षक जे.एस.पवार, ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे, इ.१० वी चे वर्गशिक्षक पी.डी.पाटील, एस.व्ही.आढावे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी वृंद यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.