TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : आदिशक्ती मुक्ताईचे विधिवत पुजन करून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2021
in मुक्ताईनगर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीकरिता महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मुक्ताई मंदिर येथे आदिशक्ती मुक्ताईचे विधिवत पुजन करून आणि नारळ वाढून करण्यात आला. त्यानंतर खडसे फार्म येथे मतदारांचा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला.

यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर,सतिष अण्णा पाटील, जळगाव महापौर जयश्रीताई महाजन, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, दिलीप सोनवणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, संजय पवार, नाना राजमल पाटील, संजय गरुड, रोहिणी खडसे खेवलकर, शिलाताई निकम, मेहताबसिंग नाईक, श्यामकांत सोनवणे, विनोद तराळ, रवींद्र नाना पाटील, वंदना पाटील, एजाज मलिक, मंगला पाटील, कल्पिताताई पाटील, सरिता माळी, वाल्मिक पाटील, रमेश नागराज पाटील, डी के पाटील, सोपान पाटील, ईश्वर रहाणे यु डी पाटील, निवृत्ती पाटील, सुधाकर पाटील, दशरथ कांडेलकर, विलास धायडे, राजू माळी, शिवराज पाटील, अरविंद गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक करताना रोहिणी खडसे म्हणाल्या गेल्या सहा वर्षांपासून सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने जिल्हा बँकेची अध्यक्ष म्हणून काम केले. या कार्यकाळात आदरातिथ्य व इतर अतिरिक्त खर्चाला कात्री लावून सर्व कारभार पारदर्शक पद्धतीने केला. बँकेचे शंभर टक्के संगणिककरण डिजिटलायझेशन केले. त्यामुळे बँकेचा कारभार जलद गतीने झाला बँकेच्या ठेवी मध्ये वाढ झाली. बँकेला क दर्जातून अ दर्जात आणता आले, बँकेने शंभर वर्षाच्या इतिहासात प्रथमच स्व भांडवलातून पतपुरवठा केला, कर्जमाफीयोजनेमध्ये राज्यात उत्कृष्ट कार्या केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर कौतुक केले आहे. नुकताच बँकेचा बेस्ट डिजिटल बँक म्हणून गौरव करण्यात आला आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने हे कार्य असेच सुरू राहील त्यासाठी आपण सर्व मतदारांनी सहकार पॅनल च्या उमेदवारांना विजयी करावे असे त्यांनी आवाहन केले.

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. गेल्या पाच वर्षात बँकेच्या संचालक मंडळाने काटकसरीनचे धोरण अवलंबुन उत्कृष्ट पारदर्शक पणे कार्य केले आहे. कुठलाही गैरव्यवहार झाला नसून विरोधक अपप्रचार करून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जिल्ह्यातील शेतकरी मतदार राजा सुज्ञ आहे. गेल्या पाच वर्षात झालेलं काम आपल्या सर्वांच्या समोर आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. संचालक मंडळाच्या विश्वासावर आणि पारदर्शक कारभारामुळे बँकेच्या ठेवीत मोठी वाढ झाली. आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेच कायम ठेवून परत एकदा सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी माजी मंत्री सतिष अण्णा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सहकार पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना एकनाथराव खडसे म्हणाले, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकाराचा समृद्ध वारसा असलेली आशिया खंडातील अग्रणी बँक आहे. स्व प्रल्हादभाऊ पाटील, जे एस अप्पा, ओंकार अप्पा वाघ यांच्या सारखे अध्यक्ष राहिलेली हि बँक आहे. त्यांनी जिवापाड मेहनत करून बँकेला वैभव, नावलौकिक प्राप्त करून दिला. मध्यंतरी काही चुकीच्या निर्णयामुळे बँकेची आर्थिक स्थिती खालावली होती ती सुस्थितीत आणण्यासाठी मागच्या पंचवार्षिकला सर्वपक्षीय पॅनलची निर्मिती केली. त्यांनंतर रोहिणी खडसे या चेअरमन झाल्या सर्व संचालक मंडळाने पारदर्शक पद्धतीने काटकसरीने कारभार केला. त्यातुन बँकेला असलेला संचित तोटा ६०० कोटी पर्यंत भरून काढण्यात संचालक मंडळाला यश आले. आज विरोधक खाजगी संस्थाना बेकायदेशीर कर्ज दिल्याचा आरोप करत आहेत. परंतु रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या नियमानुसार तारण ठेवून सर्व कर्ज दिलेले आहेत. त्याची कर्जफेड नियमित आहे. त्यातून बँकेला मोठया प्रमाणावर व्याज मिळत आहे हे सर्व नियमानुसार झालेले आहे. विरोधकांना जी चौकशी करायची असेल ती करा. यापुढे सुद्धा येणारे संचालक मंडळ पारदर्शक पद्धतीने कारभार करेल याची मी ग्वाही देतो. गेल्या संचालक मंडळाने ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक पणे भरती प्रक्रिया राबवली. बँकेचे संगणकीकरण करून कारभार जलद गतीने केला. सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने नियमानुसार केले. त्यामुळे बँक एन पी ए मधून बाहेर आली बँकेचा मोठया प्रमाणात संचित तोटा भरून निघाला बँक क वर्गातून अ वर्गात आली. हे सर्व शेतकरी बांधवांच्या सभासदांच्या मतदारांच्या सहकार्याने, विश्वासाने आणि आशीर्वादाने शक्य झाले. बँकेची ही घोडदौड अशीच कायम राखण्यासाठी सहकार पॅनल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे त्यांनी आवाहन केले. यावेळी तालुक्यातील मतदार आणि महाविकास आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे अरविंद गोसावी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
गुन्हे

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

May 12, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
गुन्हे

शेतात पार्टी अन् चुलत भावाने जे केलं ते भयंकर !

March 31, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
Next Post

'सोनिया गांधीसमोर वाकून वाकून...' ; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साकळी येथे ‘घरीच किल्ले बनवा’ स्पर्धेत अथर्व वाणी प्रथम

November 3, 2020

राज ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

October 29, 2020

मोठी बातमी : ‘५ कोटी द्या नाही तर बलात्काराची तक्रार करेन’ ; धनंजय मुडेंना महिलेकडून धमकी

April 21, 2022

दानवेंच वक्तव्य केवळ मनोरंजन ; खडसेंच्या टोला

March 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group