मुंबई (वृत्तसंस्था) ‘राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचं हे सरकार पुढील २५ वर्ष चालेल,’ असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर आता ‘ऑपरेशन लोटस’ मोहीम हाती घेतली जाणार का, अशी चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचं हे सरकार पुढील २५ वर्ष चालेल,’ असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तसंच ‘ईडी, सीबीआय आणि एनआयए यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या खिशात आहेत. ते हवं तेव्हा कोणाचीही चौकशी लावतात. मात्र आता न्यायालयेही त्यांच्या खिशात गेली की काय, अशी शंका येण्यासारखं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे,’ असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.
















