अकोला (प्रतिनिधी) सांगली जिल्ह्यात पोलिसांना वाँटेड असलेला व घरफोडीतील कुख्यात आरोपी लोकेश सुतार टोळीतील एकाला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने सांगली येथून अटक केली. तर मुख्य आरोपी सुतार हा पळून गेला. २९ नोव्हेंबर रोजी या टोळीने जुने शहरातील नीलेश राठी यांचे घरात भरदुपारी चोरी केली होती. अरूण वसंत पाटील (रा. ग्राम लिंगनूर ता. मिरज जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे पोलिसांसमोर होते मोठे आव्हान !
लोकेश सुतार याच्यावर घरफोड़ी सारखे चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. जुने शहर हद्दीतील नीलेश नवलकिशोर राठी हे २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा ते दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घर बंद करून त्याचे दुकानात गेले होते. दुपारी घरी आले असता त्यांना त्यांच्या घरात चोरी झाल्याचे दिसून आले होते. त्यांच्या घरातून चोरट्यांनी लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास झाले होते. दरम्यान दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान होते.
एलसीबी पीआय शंकर शेळके यांना मिळाली गोपनीय माहिती !
या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या नेतृत्वात एक पथक गठित करण्यात आले होते. तपासा दरम्यान सांगलीतील अट्टल घरफोड्याने घरफोडी केली असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव आणि त्यांचे पथक सांगली जिल्ह्यात रवाना झाले, गुन्ह्यात वापरलेली कार व आरोपी सांगली न्यायालयात असल्याचे समजताच पोलिसांनी न्यायालय परिसरात सापळा रचला.
असा होता अटकेचा थरार !
संशयित लोकेश सुतार आणि त्याचे साथीदार गाडीमध्ये बसल्या बरोबर पथकाने गाडी आडवी लावली. त्यास पकडण्यासाठी गेट उघडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्वरीत गाडी सुरू करून रिव्हर्स वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन वाहनांना उडविले. रस्त्यावर योग्य जागा नसल्याने काही अंतरावर जाऊन ईलेक्ट्रीक पोलला त्यांचं वाहन धडकलं. तसेच गाडीचे टायर फुटले अन् गाडी बंद पडली. त्या दरम्यान लोकेश अन् साथीदारांनी बाजूला असलेल्या वस्तीचा आणि पोलीस दूर असल्याचा फायदा घेत कारमधून पळ काढला. त्यानंतर रात्री अरूण वसंत पाटील याला पोलिसांनी पकडले, घरफोडीच्या दुन्ह्यात लोकेश सुतार याच्यासोबत आपण असल्याचे त्याने पोलिसांना कबूली दिली.
या पथकाने केली कारवाई !
ही कारवाई पीएसआय गोपाल जाधव, रवींद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, एजाज यांनी केली. फरार अट्टल चोरटा लोकेश सुतार यांच्यावर रेकॉर्डवरील ५० पेक्षा अधिक चरफोड्याचे गुन्हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली, त्याने आतापर्यंत कर्नाटक राज्यासह, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बारामती, पुणे ग्रामीण येथे अनेक गुन्हे दाखल आहेत, दरम्यान तीन वर्षापुर्वी लोकेश सुतार चालवत असलेली गुन्हेगारी टोळीने घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, आर्म अॅक्ट सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांची नोंद त्याच्यावर आहे. सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातून त्याच्यावर हाइपारच्ची कारवाई करण्यात आली आहे.
आरोपीकडून ७ लाखांवर मुद्देमाल केला जप्त !
अटक करण्यात आलेलया आरोपीकडून १२ तोळे सोनं, गुन्ह्यात वापरलेली कार व आयफोन गुनद्यात जप्त केला आहे. गुन्ह्यातील अपघात ग्रस्त कार ही चालविण्याचे परिस्थीतीत नसल्याने तसेच लेखी पत्र देवून सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. दरम्यान, फरार अट्टल चोरटा लोकेश सुतार यांच्यावर रेकॉर्ड ५० पेक्षा अधिक अट्टल घरफोड्याचे गुन्हे दाखल आहे. त्याने आतापर्यत कर्नाटक राज्यासह, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बारामती, पुणे ग्रामीण येथे अनेक गुन्हे दाखल आहेत.