TheClearNews.Com
Monday, December 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लिंबूवर्गीय फळांसाठी मातीचे आरोग्यासोबत पाण्याचे व्यवस्थापन सांभाळा – डॉ. हिमांशू पाठक

जैन हिल्स येथे 'राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५ सुरवात

vijay waghmare by vijay waghmare
December 22, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : भारताने शेतीत गेल्या काही दशकांत खूप प्रगती केली आहे. अन्नसुरक्षेतेमध्ये स्वालंबन मिळविले आहे. अन्नधान्यासोबतच फलोत्पादन वाढले आहे, मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोषणमूल्ये जोपासली गेली पाहिजे. त्यासाठी मातीचे आरोग्य सांभाळणे, पाण्याचे व्यवस्थापन करणे, खतांचे कार्यक्षमतेने वापर करणे आवश्यक आहे. टिश्यूकल्चर, ठिबक, स्प्रिंकलर तंत्रज्ञानाला विज्ञानाचा आधार असून त्याचा वापर वाढला पाहिजे. जल, जमिन, जंगल, जलवायू, जनता यांच्यात शास्त्रोक्त काम करण्यासाठी शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योजक, विविध संशोधन संस्था यांच्या सामूहिक प्रयत्नातून पर्यावरणाचा ऱ्हास न होता फलोत्पादनामध्ये मूल्यवर्धनाच्या दृष्टीने शाश्वता आणता येईल, असा विश्वास दिल्ली येथील नॅशनल अकॅडमी ऑफ अॅग्रीकल्चर सायन्सेस (एनएएस) चे अध्यक्ष डॉ. हिमांशू पाठक यांनी व्यक्त केले.

देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) चे आयोजन केले आहे. उद्गघाटनाप्रसंगी डॉ. हिमांशू पाठक बोलत होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर नागपूरचे इंडियन सोसायटी ऑफ सिट्रसचे अध्यक्ष डॉ. दिलीप घोष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, शास्त्रज्ञ डॉ. एन. कृष्णकुमार, गांधी रिसर्च फाऊंडेशचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अय्यंगार यांची उपस्थिती होती. जैन हिल्स् गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात दीपप्रज्वलनाद्वारे उद्धाघाटन झाले. वंदेमातरम् व जय जय कृषी परिषद भारत की… हे आयसीआर गीत सुरवातीला सादर झाले. यानंतर अनुभूती निवासी स्कूल च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. संगीता भट्टाचार्य, डॉ.व्यंकटश रमण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी आभार मानले. परिषदेच्या उद्घाटन सत्रानंतर ऑरेज फिस्टा प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांनी केले.

READ ALSO

रावेर लोकसभेत भाजपाचा दबदबा; जळगावात शिंदे गट ‘फॉर्मात’

बाजार समितीत चोरी; बालाजी ट्रेडिंग कंपनीतून 1.70 लाखांची रोकड लंपास

डॉ. हिमांशू पाठक म्हणाले, अन्नधान्याच्या बाबतीत चांगले काम झाले. आपण आयातदार होतो. आता निर्यातदार, पुरवठादार झालो आहोत. कोविड काळात देशाने जगाला अन्न पुरविले. हे शेतकरी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ यांच्या मदतीने शक्य झाले आहे. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून काम व्हायला हवे. लिंबूवर्गीय पिकांत काम केले जात आहे. पण ढासळलेली उत्पादकता व अन्य समस्यांना दूर करण्यासाठी एकत्रीत प्रयत्न हवे आहेत. शेतकऱ्यांना शाश्वत, पर्यावरणपूरक उपाय, तंत्र पुरविण्याची आवश्यकता आहे. जैन इगिरेशनसारख्या संस्था विज्ञानासोबत तंत्रज्ञानाला धरून पाणी, पर्यावरण यासंबंधी चांगले काम करीत आहेत. पाणी, माती व्यवस्थापनातून बुंदेलखंडमध्ये फळपिके वाढली. केंद्र सरकार त्यासाठी कार्यक्रम, प्रयत्न आणते. नवे शास्त्र, तंत्र हवे आहे, असेही डॉ. हिमांशू पाठक म्हणाले.

डॉ. दिलीप घोष यांनी प्रास्ताविक केले. त्यात ते म्हणाले, भारत जगातील लिंबूवर्गीय फळांच्या (सायट्रस) उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे (चीन आणि ब्राझीलनंतर). तरीही या क्षेत्राला हवामान बदल, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, दर्जेदार रोपांच्या कलमांची कमतरता, बाजारभावातील अनियमितता अशी मोठी आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित परिषदेचा मुख्य विषय ‘भरघोस उत्पादन, हवामान बदल आणि मूल्य साखळी व्यवस्थापन’ आहे, जो या समस्यांवर लक्ष केंद्रित करून शाश्वत उपाय शोधण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे सांगत संशोधक म्हणून आपल्याकडील ज्ञानाचा वापर समाजातील प्रत्येक घटकाला झाला पाहिजे त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाला सोबत घेऊन लिंबू वर्गीय फळांमध्ये काय सुधारणा करता येईल यासाठी ही परिषदेत महत्त्वाची असल्याचे म्हणाले. स्वस्थ भारत समृद्ध भारत घडविण्यासाठी पुढे आले पाहिजे. कारण आरोग्यामध्ये लिंबूवर्गीय फळांचे महत्त्व मोलाचे आहे.

पौष्टीक अन्न पिकवू आणि देश घडवू – डॉ. एन. कृष्ण कुमार

डॉ. एन. कृष्णकुमार म्हणाले की, मनुष्याला आरोग्यदृष्ट्या खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मधुमेहासह अन्य व्याधींनी आपण त्रस्त आहोत. आपण अन्नसुरक्षा तर मिळवली मात्र पौष्टीक सुरक्षेत अजूनही भारत मागे आहे. वाढ, विकास आणि देखभाल यासाठी मूल्यवर्धित पोषकतत्व असलेल्या फळांच्या सेवनाकडे आपण वळले पाहिजे. फलोत्पादन हे सर्वात्तम उत्तर पोषणाचे संयोजनासाठी आहे. रोज सकाळी एक ग्लास संत्र्याचा ज्यूस प्यायलाने आरोग्य सांभाळले जाते. विदेशात भारतीय लोणच्यांना खूप मागणी आहे त्यासाठी लिंबूवर्गीय फळांचे लोणचे तयार करुन पाठविता येऊ शकते. निर्यात वाढल्यास देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामुळे देशांतर्गत वापरासोबतच निर्यातीसाठी अधिक उत्पादन, पोषणमूल्ययुक्त आणि सुरक्षित अन्ननिर्मिती करणे आवश्यक आहे. मोसंबी हे उत्पादन, लागवडीचा कालावधी आणि उत्पन्नाच्या दृष्टीने अतिशय उत्तम पीक आहे. मानांकीत नर्सरीतूनच रोगमुक्त रोपं घेतली पाहिजेत. मदर नर्सरी ही बंदिस्त वातावरणात असावी जेणे करुन शास्त्रोक्त रोपांची निर्मीती करता येईल. ह्या रोपांना प्राधान्यक्रम दिले पाहिजे.

शेतकरी नवप्रेरक – डॉ. सुदर्शन अय्यंगार

विशेष अतिथी म्हणून बोलताना गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अय्यंगार म्हणाले की, अर्थशास्त्रासोबत नैतिकता व्यवहारात आणली पाहिजे. संशोधक, वैज्ञानिक, अभ्यासकांनी केलेले संशोधन हे काय आहे आणि कशासाठी उपयुक्त ठरू शकते. हे प्रश्न विचारून महात्मा गांधीजींना अभिप्रेत असलेला समाजाची निर्मिती केली पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: शेतीत केलेले बदल हे अमूर्त मॉडेल ठरतात ते नवप्रेरक असतात. भवरलाल जैन हे शेतकरी ते शेतीपूरक उद्योजक होऊ शकले त्यांनी समाजातील अंतिम घटकांमध्ये परिवर्तनाचा विश्वास निर्माण केला.

संत्र्याला मूल्यवर्धित अन्नापैकी एक मानावे – अनिल जैन

शेत, शेतकरी आणि पर्यावरण संवर्धनासोबतच फलोत्पादन कसे वाढविता येईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. अंतिम ग्राहकांसाठी ‘सुफर फुड’ कसे देता येईल यासाठी लायब्ररी, लॅब, लॅण्ड चा सुयोग्य वापर केला पाहिजे. किती उत्पादन झाले यापेक्षा शेतकऱ्याला किती उत्पन्न एकरमागे मिळाले हे महत्त्वाचे आहे. जगातील प्रतिभावन शास्त्रज्ञ हे भारतात आहेत सर्वांगिण दृष्ट्या संशोधनाचा प्रचार प्रसार हा शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजे. ज्ञानाचे हस्तांरणार भर दिला. “चला, फळांचा रस घेऊया आणि आरोग्य सांभाळू या.” असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला. २०२५ ची ही परिषद जी संत्रासाठीच्या भविष्यासाठी महत्वाची ठरेल. पुढील २५ वर्षांत आपण हे की हा एक असा प्रसंग होता ज्यामुळे हे परिवर्तन घडवणारा विचार निर्माण झाला. मान्यवरांनी जैन इरिगेशन निर्मित “सिट्रस कल्टिवेशन गाइड” पुस्तकाचे प्रकाशन केले. परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. लिंबूवर्गीय फळ पिकांसंबंधित पिकवाणांचे सादरीकरण झाले.

जैन इरिगेशनतर्फे दोन वाणांचे लॉन्चिंग..
जैन इरिगेशन सिस्टीम्स तर्फे लिंबूवर्गीय फळांमध्ये जैन स्वीट ऑरेंज-६ व जैन मॅन्डरीन-१ हे दोन वाण नव्यानेच विकसीत केले आहे. त्यांचे हेमचंद्र पाटील, शिवाजीराव चव्हाण, नवीनकुमार पेठे, अजित जोशी, संतोषकुमार पेठे, के. टी. रेड्डी, एन. श्रीधर, गोणकुंठा लेपाक्षी, व्ही. उमामहेश, बी. व्ही. रेड्डी. या दहा शेतकऱ्यांना ही दोघं वाणांची रोपं देऊन सत्कार करण्यात आला. जैन मॅन्डरीन-१ हे दुसऱ्याच वर्षी उत्पादन देणारं वाण असून ते नागपूर संत्राला उत्कृष्ट पर्याय ठरू शकते असे मत डॉ. मिलींद लधानिया यांनी सांगितले.

मान्यवरांचे पुरस्कार..
लिंबूवर्गीय परिषदेमध्ये फेलोशिप प्रदान करण्यात आली. त्यात डॉ. चंद्रिका रामादुगु (कॅलिफोर्निया विद्यापीठ, अमेरिका), डॉ. मंजुनाथ केरेमने (USDA, अमेरिका), डॉ. अवी साडका (वोल्कानी संस्था, इस्रायल), डॉ. शैलेंद्र राजन (माजी संचालक, ICAR-CISH), डॉ. एम. कृष्णा रेड्डी (माजी शास्त्रज्ञ, ICAR-IIHR), डॉ. अवतार सिंग (माजी शास्त्रज्ञ, IARI), डॉ. आकाश शर्मा (प्राध्यापक, SKUAST-जम्मू), डॉ. शिव शंकर पांडे (IASST, गुवाहाटी), डॉ. आर. एम. शर्मा (प्राध्यापक, IARI), डॉ. अवतार सिंग (माजी प्रिंसिपल सायंटिस्ट, ICAR), डॉ. आकाश शर्मा (शेर-ए-काश्मीर युनिव्हर्सिटी, जम्मू), डॉ. सुशंकर पांडे (DBT रामानुजन फेलो, आसाम), डॉ. आर्यन शर्मा (प्रोफेसर, IARI, न्यू दिल्ली) यांचा फेलोशिप देऊन गौरव करण्यात आला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMaintain soil health along with water management for citrus fruits - Dr. Himanshu Pathak

Related Posts

जळगाव

रावेर लोकसभेत भाजपाचा दबदबा; जळगावात शिंदे गट ‘फॉर्मात’

December 22, 2025
चाळीसगाव

बाजार समितीत चोरी; बालाजी ट्रेडिंग कंपनीतून 1.70 लाखांची रोकड लंपास

December 21, 2025
गुन्हे

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
गुन्हे

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

December 20, 2025
जळगाव

अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी – प्रेम कोगटा

December 19, 2025
विशेष लेख

दिपनगर येथील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी ; आ. एकनाथराव खडसेंची मागणी

December 19, 2025
Next Post

रावेर लोकसभेत भाजपाचा दबदबा; जळगावात शिंदे गट ‘फॉर्मात’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा : न्या. ए. ए. शेख

July 19, 2022

अमळनेर हादरलं ! चारित्र्याच्या संशयावरून पती केला पत्नीचा गळा दाबून खून !

September 9, 2022

परिवर्तनामध्येच शेतकऱ्यांची उन्नती : अनिल जैन !

August 16, 2024

धरणगाव राष्ट्रवादीच्या प्रमुख पदधिकाऱ्यांची आढावा बैठक उत्साहात !

March 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group