जम्मू- काश्मीर (वृत्तसंस्था) श्रीनगर परिसरात दहशतवाद्यांनी पुन्हा भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत.
श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर तीन दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराचा वेढा दिला आहे. श्रीनगरमधील HMT परिसरात सुरक्षा दलाच्या टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या परिसरात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन जारी असून परिसरात ज्यादा कुमक तैनात करण्यात आली आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. या हल्ल्याविषयी माहिती देताना पोलीस महानिरिक्षक म्हणाले, हल्लेखोर मारुती कारमध्ये आले होते. त्यांनी अचानक जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता आहे. शोधमोहिम सुरू असून संध्याकाळपर्यंत या विषयी अधिक माहिती मिळेल. या हल्ल्यात आपले दोन जवान शहीद झाले आहे.
बारा वर्षांपूर्वी याच दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलवर भ्याड हल्ला केला होता आणि आज श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. काही दिवसांपूर्वी जम्मूतील नगरोटा भागातील टोल नाक्याजवळ ४ जैश एच्या दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात आला होते. हे दहशतवादी २६/११ दिवशी मोठा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर त्यांचा खात्मा करण्यात आला होता.