जळगाव (प्रतिनिधी) शहरात २ जानेवारी रोजी कांताई सभागृहात मजरूह अकॅडमी तर्फे 9 कविवर्य व उर्दू साहित्य यांना निशान ये मजरूह पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईकराचे अब्दुल करीम सालार तर उदघाटक व विशेष अतिथी म्हणून मानियार बिरादारीच चे फारुक शेख यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर औरंगाबादचे डॉ. दोस्त मोहम्मद खान, जळगावचे बंगाली असो चे महेंद्र माहिटी, व मजरूर अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. शाफिक नाजीम यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम हाफिज मुश्ताक यांनी कुराण पठण केले. फारुक शेख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मजरुह चे अध्यक्ष डॉ. शफिक नाजिम यांनी प्रास्ताविकात द्वारे ज्या नऊ सहित्यिकिना सन्मानित करण्यात येत आहे. त्यांची थोडक्यात माहिती विशद केली. या पुरस्कारार्थीना निशान हे मजरूह पुरस्कार बद्दल मेमोनटो, शाल व बुके देऊन मुफ्ती अबुजर, करीम सालार, फारुक शेख, डॉक्टर दोस्त मोहम्मद खान व महेंद्र मायटी मयांच्या हस्ते गौरवण्यात आले.
निशाने मजरूह पुरस्कारार्थी
कय्युम राज (मारुड) चरागोद्दीन चराग ताज मोहम्मद ताज व शयुर आशना (सर्व बरहानपूर), माईल पालधवी (सुरत), सईद जिलानी, अखलाक निजानी, काजी जमीर अशरफ, शकील अंजूम (सर्व जळगाव) पुरस्कार वितरण नंतर मुशायरा चे आयोजन करण्यात आले होते. त्यात नऊ पुरस्कारार्थी सह इतरांनी सुद्धा आपल्या गझल व शायरी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मजरुह अकादमी चे शफिक नाजिम, रशीद पिंजारी, काजी रफिक, बाबा मलिक व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.