भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी हद्दपारच्या नोटीसविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका परत घेतली आहे. त्यावर यासंबंधी कारवाईच्या प्रकरणाची सुनवाई लवकर घेण्याची अपेक्षा उच्च न्यायालयाने प्रशासनाकडून व्यक्त करत तसे निर्देश दिले आहेत.
भुसावळातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून गुन्हेगारांच्या टोळ्या हद्दपार करण्याची कारवाई सुरू केली आहे. यात भुसावळातील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांना सुद्धा हद्दपारीची नोटीस प्रशासनाने दिली होती. त्याविरुद्ध अनिल चौधरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेच्या खुलासासंदर्भात प्रशासनाने न्यायालयात अहवाल दाखल केला होता. त्यानंतर अनिल चौधरी यांनी सदरची याचिका परत घेतली आणि प्रशासनाने यावर लवकर सुनवाई घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली. त्यावर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने सदर हद्दपारच्या कारवाईवरील सुनवाई तातडीने पूर्ण करावी. तसेच त्यावर लवकर निर्णय घ्यावा, असे कोर्टाला देखील अपेक्षित असल्याचे म्हटले दिले. त्यामुळे आता अनिल चौधरी यांच्या हद्दपारीच्या कारवाईचे कामकाज प्रशासनाला लवकर चालवावे लागणार असून त्यावर लवकर निर्णय द्यावा, लागणार आहे. दरम्यान, या वृत्ताला सरकारी वकील सचिन सलगरे यांनी दुजोरा दिला आहे.