विश्वाला जगा व जगू द्याचे संदेश देणारे अहिंसेचे महानपुजारी जैन धर्मीयाचे २४ वे अंतीम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा दि २१ एप्रिल रविवारला २६२३ वा जन्मकल्याणक महा महोत्सव दिना निमित्त नगरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्या शोभायात्रेकडे कुसुंबेकरांचे लक्ष वेधले गेले. त्या प्रसंगी सर्वधामियांकडून मंगल आरती ओवाळून स्वागत केले. काही भक्त गण आपल्या दारातूनच भगवान महावीर स्वामींना वंदन करून आपली भावना व्यक्त करीत होते. अशी माहिती प्राचीन जैन अतिशय विश्वस्त आणि खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख सतिश वसंतीलाला जैन आणि महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली. मिरवणुक मार्गक्रमण करित असता. अधून मधून भक्तगण भः महावीर स्वामींचा तसेच आचार्य विद्यासागरजी मुनिश्रीचा आणि कुसुंबा गौरव असलेले तपस्वीवृन्दांचा जयघोषाने नगरी गजबजली होती. पार्श्वनाथ सेवा समिती तर्फे व पद्मावती युवा मंचाच्या सहकार्याने मंगलमय वातावरणात विविध धार्मिक उपक्रम झाले.
भगवान महावीर स्वामीच्या जिनप्रभावना मिरवणुकीचे सर्वधर्मीयांनी जयघोष तून स्वागत केले. भगवान महावीर स्वामीच्या प्रतिमेसह सुशोभित वासूट्रेडर्सच्या ट्रॅक्टर मधून मिरवणूक निघाली. बँड पथकासह सुशोभित पांडुशिला देखावे नेत्रदीपक ठरले. मिरवणुकीचे जैन मंदिराजवळ समारोप झाला. मंदिरात महाअभिषेक प्रसंगी विश्वात सुखसमृद्धी लाभो यासाठी विश्वशांती मंत्राद्वारे (शांतीमंत्र वाचनाने) भगवंतावर शांतीधारा (जलधारा) चे यावर्षीचा पुण्यार्जनाचा लाभ अतुल चंद्रकात जैन यांना सौभाग्य प्राप्त झाले होते. लोकोपयोगी उपक्रम, मंदिरात अभिषेक महिला पुरुषातर्फे गटागटाने भगवार महावीर स्वामीचे पूजन पाठ, २४ तीर्थकर पूजा, दर्शनाचा रात्री शास्त्र वाचन, महाआरतीचा आणि दिवसभर विविध
धार्मिक विधीचा बहूसंख्य भाविकांनी लाभ घेताला. जन्मकल्याणक महोत्सवा निमित्त एकमेकांना शुभेच्छा देउन आनंद द्विगुणीत केला. महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता झाली…