चाळीसगाव (प्रतिनिधी) राजकारणात जाती पातीच्या पलीकडे जाऊन सर्वांचा विकास करणारे नेतृत्व राजकारणात खूप कमी असतात. जनतेला काय हव… त्यांच्या मुलभूत गरजा काय याची जाणीव ज्यांना असते ते खूप पुढे जातात. आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे नेतृत्व सर्वाना सोबत घेऊन जाणारे आहे, हातगाव ही अध्यात्मिक भूमी असून इथे असणाऱ्या राममंदिराचे मोठे महात्म्य आहे आणि या श्रीराम मंदिराच्या सभामंडपासाठी आपला निधी आमदारांनी दिला तसेच गावात गिरणेचे पाणी आणल्याने पुढील काळात श्रीरामाचा व जनतेचा आशिर्वाद आमदार चव्हाण यांच्या पाठीमागे निश्चित राहिल असे प्रतिपादन माजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री एम.के.अण्णा पाटील यांनी व्यक्त केले. ते हातगाव येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या गिरणा धरणावरील ७५ कोटींची पाणीपुरवठा योजना तसेच गावातील २० लाखांचे सभामंडप, ३ कोटी ५० लक्ष निधीतून माळशेवगे – हातगाव ते रोहिणी जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, २५ लाखांचे वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ पेव्हर ब्लॉक बसविणे व गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे आदी ४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी मंचावर आमदार मंगेशदादा चव्हाण, पंचायत समिती सदस्य विष्णू चकोर, सरपंच सौ संगीता चव्हाण, विकासो चेअरमन प्रकाश निकम, विकासो व्हा.चेअरमन दिलीप चकोर, संचालक विजय आव्हाड, संजय नागरे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रा. सुनील निकम सर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकरभाऊ जाधव, भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल भाऊ नागरे, भाजपा कायदा आघाडी तालुकाध्यक्ष एड.भागवत पाटील, भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष निलेश पाटील, माजी सरपंच दत्ता नागरे सर, शक्तीकेंद्रप्रमुख समाधान आव्हाड यांच्यासह पंचक्रोशीतुन आलेले पिंपळवाढ निकुंभ येथील नानाभाऊ जगताप, सुनील लोधे, तळेगाव येथील चेतन देशमुख, महेश शिंदे, पिंपळगाव येथील संतोष देशमुख ज्ञानेश्वर बागुल, तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, अंधारी सरपंच गिरीश पाटील, प्रफुल पाटील, जय भारत नागरे, तमगव्हाण धनराज पाटील, ब्राम्हणशेवगे येथील पिंटूदादा बाविस्कर, माळशेवगा विलास पाटील, राम पाटील, दीपक पाटील, बंडू पगार, राजेंद्र पाटील, अंधारी पोलीस पाटील शरद नागरे, वसंत पाटील, सेवा नगर डॉ. प्रकाश राठोड, शिंदी उपसरपंच गोरख राठोड, पत्रकार एम.बी.पाटील, ह.भ.प.मनोज महाराज हातगावकर, माजी सरपंच गोरख तात्या, संतोष भाऊ मोकाटे, बाळू नाना, नमो ताई राठोड, अरुण आबा पाटील, सचिन भाऊ सानप, नितीन पाटील, रत्नाकर पाटील, देविदास भाऊ, दशरथ वाघ व एकलव्य संघटना पदाधिकारी, गावातील युवक मित्र मंडळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना जाती पातीच्या पलीकडे जाऊन सर्व समाज घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा माझा प्रयत्न राहत आला आहे. कायम दुष्काळी व विशेषतः उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असणाऱ्या हातगाव सह परिसरातील १७ गावांसाठी थेट २७ किमी दूर गिरणा धरणावरून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील जलजीवन मिशन अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील, नामदार गिरीषभाऊ महाजन यांच्या सहकार्याने माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा आता कायमचा हटणार आहे. गावाला फिल्टर प्लांट वरून शुद्ध पाणी मिळणार असल्याने दुषित पाण्यामुळे होणारे आजार देखील बंद होतील. माझ्या हाताने हे पुण्याचे काम होत आहे याचे मी समाधान मानतो. तसेच हातगाव व परिसराला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची कामे मंजूर केली असल्याने इथल्या शेती व इतर पूरक उद्योगांना गती मिळेल असे त्यांनी सांगितले.
आमदार चव्हाण मनोगत व्यक्त करत असताना भिल्ल समाजातील पदाधिकारी यांनी एकलव्य भवन बांधकाम करण्याची मागणी केली तसेच गावातील एका महिलेने महिला वर्गासाठी शौचालय बांधून द्यावे अशी मागणी केली. त्यांनी व गावातील इतर मागणी लक्षात घेता आदिवासी भिल्ल समाजासाठी सभामंडप व महिलांसाठी शौचालय व इतर आवश्यक कामांसाठी अजून ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गडगडाटात घोषणेचे स्वागत केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. आमदार मंगेश चव्हाण व एम.के.अण्णा पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांच्या भूमिपूजन फलकांचे अनावरण करण्यात आले. तसेच गावातील सुवासिनींनी मान्यवरांचे औक्षण केले. आमदार चव्हाण यांनी रामनवमीच्या निमित्ताने आयोजित किर्तन सप्ताहात काल्याच्या कीर्तनाची दहीहंडी फोडली तसेच राममंदिरात श्रीराम, माता सिता, लक्ष्मण यांचे दर्शन घेतले.
विष्णू चकोर यांनी गावात २०१३ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असल्याने हातगाव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हातगाव देशनाला सांडवा बंद करणे, गावात मुलभूत सुविधा आदी बाबतीत निधीची मागणी केली. प्रा.सुनील निकम यांनी भारतीय जनता पक्षाचे केंद्रात व राज्यात सरकार आल्यानंतर रस्ते, सिंचन, पाणीपुरवठा व मुलभूत सुविधा विकासकामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने तसेच शेतकरी, महिला यांच्यासाठी विविध योजना राबविल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता नागरे सर यांनी केले तर सूत्रसंचालन भारत पाटील सर यांनी केले.