TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गौराई ग्रामोद्योग येथे आजपासून ‘मॅंगो फिस्टा’ आगळंवेगळं प्रदर्शन

१५० हून अधिक देशी-विदेशी व संकरित आंबा वाणांचा समावेश

vijay waghmare by vijay waghmare
May 20, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० हून अधिक जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात आयोजित केले आहे. ‘मॅंगो फिस्टा’ हे प्रदर्शन दि.२१ ते २२ दरम्यान सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल. २१ रोजी सकाळी १० वाजता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. विशेष म्हणजे या दोन दिवसात प्रदर्शनावेळी आंब्यापासून तयार होणाऱ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद ‘देशी ब्लिस’ येथे घेता येणार आहे.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. (JISL) या आघाडीच्या कृषी कंपनीकडून आंबा उत्पादनक्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्यात येत आहे. आंब्याच्या उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी उच्च घनता व अतिउच्च घनता लागवड पद्धती, ठिबक सिंचन व खतसिंचनाचा वापर आदी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रयोग यशस्वी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर जैन हिल्स येथे कंपनीकडून भव्य ‘जैन आंबा प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात देश-विदेशातून आणलेले आणि जैन इरिगेशनने स्वतः विकसित केलेले १५० पेक्षा अधिक आंबा वाण / जनुकप्रकार प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये १० विदेशी व ३० नवे संकरित वाणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे सर्व वाण जैन हिल्स येथील बागायत प्रयोगशाळांमध्येच पिकवलेले आहेत.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

जैन इरिगेशनच्या संग्रहात एकूण १६० वाणांचे संकलन आहे, त्यापैकी ८० वाणांचे प्रदर्शन या ठिकाणी आहे. तसेच, संस्थेच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या ८०० हून अधिक संकरित वाणांपैकी ३० वाणांचे परीक्षणासह सादरीकरण यामध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनात काही वाणांचे फळ १ किलोपर्यंत वजनाचे, काही वाण अतिशय गोड चव असलेले, तर काही लालसर किंवा गडद पिवळ्या रंगात लाल छटा असलेले आहेत, जे अत्यंत स्वादिष्ट, देखणे व आकर्षक आहेत. विदेशी वाणांमध्ये ऑस्ट्रेलियाचे किंगस्टन प्राईड, पामेर, ऑस्टिन, फिलिपाईन्सचा कॉरोबो, अमेरिकेचे केंट व टॉमी अटकिन्स, थायलंडचा किंगफॉन, आणि इस्राईलचा माया यांचा समावेश आहे. विविध नावाजलेल्या संस्थांनी विकसित केलेल्या रत्ना, मल्लिका, सोनपरी यांसारखे दर्जेदार वाण देखील प्रदर्शनात आकर्षण ठरू शकतील.

या प्रदर्शनात केवळ विविध आंबा वाण पाहण्यासाठीच नव्हे तर आंबा क्षेत्रातील तज्ज्ञांद्वारे सविस्तर माहिती मिळवण्याची संधीही मिळणार आहे. जैन इरिगेशनच्या या उपक्रमामुळे शेतकरी, बागायतदार, संशोधक तसेच आंबा रसिक यांना आंबा उत्पादनाच्या नव्या वाटा व शक्यता समजून घेता येणार आहेत. ‘मँगो फिस्टा’ प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आवाहन शिरसोली रोडवर असलेल्या गौराई ग्रामोद्योग मॉलतर्फे केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMango Fiesta’ to be held at Gaurai Gramodyog from today

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 21 मे 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“अजित पवार तुम्ही राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं?” : निलेश राणे

December 16, 2020

‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, विरोधकांनी समजून घेतले पाहिजे : शिवसेना

February 23, 2021

मराठी प्रतिष्ठान व जळगाव जनता बँकेच्या संयुक्त उपक्रमातून दहा महिलांना पिंक रिक्षाचे वितरण !

September 28, 2022

अशिक्षित व्यक्ती म्हणजे भारतावरचं ओझं : गृहमंत्री अमित शहा

October 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group