जळगाव (प्रतिनिधी) मणिपूर येथे महिलांवर अत्याचार झाल्याचा नुकताच समोर आलेल्या व्हिडिओनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
मणिपूर येथील व्हिडिओमध्ये इतक्या घाणेरड्या आक्षेपार्ह स्तिथित महिलांची धिंड काढून व सामूहिक बलात्कार करून त्यांच्यावर जो अत्याचार केला गेला आहे, त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर अध्यक्ष अशोक भाऊ लाडवंजारी ,युवक महानगर अध्यक्ष रिंकू चौधरी,महिला महानगर अध्यक्ष मंगलाताई पाटील, राजू मोरे,रिजवान खाटीक ,नईम तडवी जावळे हितेश,आशिष तडवी,रोहित शिंपी ,अमोल भावसार ,योगेश लाडवंजारी ,मतीन सय्यद यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.