धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरातील मोठा माळीवाडा परिसरातील रहिवासी मनोज अशोक माळी यांना सलग चौथ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार द बेस्ट डिजिटल किंग अवार्ड २०२० झूम मीटिंगद्वारे हा बहूमान मिळाला आहे. मनोज माळी हे कृषी क्षेत्रातील नामवंत कंपनी कोरटेवा ॲग्री ग्रसायन्समध्ये मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत.
शेतकऱ्यांना वेळोवेळी पिकाची माहिती आणि मार्गदर्शन धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मनोज माळी हे करत असतात. नोकरी करत असताना गोदावरी इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट रिसर्च येथे बाहेरून शिक्षण एम.बी.ए करीत आहेत. प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार मार्केट डेवलपमेंट इफेक्टिवेनेस २०१७ हा पुरस्कार इगतपुरी नाशिक येथे देण्यात आला होता. द्वितीय राज्यस्तरीय पुरस्कार डिमांड जनरेशन अवार्ड २०१८ इंटरनॅशनल हॉटेल नागपूर येथे देण्यात आला. तृतीय राज्यस्तरीय पुरस्कार द अचीवर २०१९ रामोजी सिटी हैदराबाद येथे नेशनल लीडर रेड्डी व विवेक शर्मा यांच्या हस्ते देण्यात आला. आता २०२१ मध्ये सलग चौथ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार द बेस्ट डिजिटल किंग अवार्ड २०२० झूम मीटिंगद्वारे बहूमान मिळाला. सावित्रीबाई फुले चौक व मोठा माळीवाडा परिसर यातील सर्व नागरिक व धरणगाव वासियांनी अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला.
कंपनीचे अधिकारी एरिया सेल्स मॅनेजर केतन गर्ग, पवन साबळे, जिल्हा मार्केटिंग मॅनेजर रामधन परदेशी, संजय सोनवणे, महेंद्र पाटील यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल आणी कृषी विक्रेते, शेतकरी बंधू यांचे नेहमी सहकार्याबद्दल ऋणी राहील, असे प्रतिपादन मोठा माळीवाडा परिसरातील सलग चौथ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मनोज अशोक माळी यांनी केले.