बोदवड (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा दूध संघाच्या ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ५ सप्टेंबर गुरुवार रोजी संपन्न झाली. यावेळी बोदवड तालुक्यातून उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल मनुर बु.दूध उत्पादक सहकारी सोसायटी ली. मनुर बू. ता.बोदवड या संस्थेला प्रथम पारितोषिक व स्मृतिचिन्ह देवुन संस्थेस रक्कम ३००१/रू.व साचिवास रक्कम २५०१/ रुपयांचे बक्षीस देवुन संस्थेस सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे चेअमन एकनाथ रघुनाथ देवकर व संस्थेचे संचालक तथा जिल्हा बँकेचे संचालक संचालक अँड. रवींद्र प्रल्हादराव पाटिल व संस्थेचे सचिव किसन काशिनाथ लोड यांनी जिल्हा दूध संघाचे म. चेअरमन आ. मंगेश चव्हाण , संचालक मंडळ व म. कार्यकारी सचालक साहेब यांचे विशेष आभार मानले. संस्थेचे संचालक आणि मार्गदर्शक अँड.रवींद्र प्रल्हादराव पाटिल यांनी आपल्या मनोगतात।सांगितले की आमची मनुर बू दूध उत्पादक सहकारी सोसायटी ही सन २०२३/२०२४ या आर्थिक वर्षात बोदवड तालुक्यातून उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल प्रथम आलेली आहे व पुढील वेळेस आमची संस्था ही जळगाव जिल्हातून प्रथम क्रमांक मिळेल यासाठी प्रयत्नशील राहील असे संस्थेचे सर्व दूध उत्पादक सभासद व सस्थेचे कर्मचारी यांचेही आभार मानले.