रायपूर (वृत्तसंस्था) छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये माओवाद्यांनी DRG आणि ITBP च्या जवानांनी भरलेल्या बसला माओवाद्यांनी स्फोट करुन उडवली आहे. या स्फोटात ३ जवान शहीद झाले असून, ८ गंभीर जखमी आहेत.
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात जवानांनी भरलेली बस माओवाद्यांनी स्फोट करुन उडवली आहे. या घटनेत ३ जवान शहीद झाले असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण २७ च्या आसपास जवान या बसमधून प्रवास करत होते, अशी माहिती समोर येत आहे. तसेच माओवाद्यांनी काडेनर आणि मांडोडाजवळ जवानांच्या बसला लक्ष्य केले. जवान आपले ऑपरेशन पूर्ण करून परतत असतानाच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले की, या हल्ल्यात ३ डीआरजी जवान आणि एक पोलीस शहीद झाला असून, १४ जवान जखमी झालेत. दोन जवानांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. छत्तीसगडचे डीएम अवस्थी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात डीआरजी (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू झाला आणि काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
हल्ल्यातील जखमींची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अतिदुर्गम भाग असल्याने नेटवर्क नाही, त्यामुळे माहिती मिळवण्यासही अडचणी येत आहेत. जखमी जवानांना मदत पोहोचवण्यासाठी पोलीस विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. जवळच्या सगळया कॅम्पमधून मदतीसाठी जवान रवाना करण्यात आले आहेत. जखमींना नारायणपूरच्या रुग्णालयात आणण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.