नशिराबाद (सुनिल महाजन) येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव ग्रामीणच्या वतीने सर्व मराठी शाळांचे शिक्षक व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान पत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी इंग्रजी ही श्रीमंतांची भाषा व मराठी गरिबांची भाषा असा गैरसमज आहे म्हणून मराठी भाषा मागे पडत आहे, असं अँड. जयप्रकाश बाविस्कर म्हणाले.
यावेळी मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. नशिराबाद-पालकांना जे अपेक्षित आहे ते शिकवले तर मराठी शाळा प्रगत होतील व मराठी भाषा अधिक समृद्ध होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार अँड. जयप्रकाश बाविस्कर यांनी आज नशिराबाद येथे केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना व मराठी पत्रकार यांना आज सन्मानित करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जग एका मुठीत आले आहे, प्रत्येक पालकाला असे वाटते माझा पाल्य खूप शिकून मोठा व्हावा त्याने जगभरात जावे या करिता त्याला इंग्रजी यावे अशी ईच्छा असते त्या मुळे त्यांचा कल इंग्रजी शाळेकडे असतो. जर मराठी शाळेत चांगले इंग्रजी शिकवले तर मराठी शाळा अधिक समृद्ध होतील असेही त्यांनी विचार मांडले. झालेल्या सत्कार व गौरविण्यात आल्या मुळे मराठी शिक्षक व पत्रकारांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष व आयोजक मुकुंदा रोटे त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. आमचा कोणी आतापर्यंत गौरव केला नाही तो आपण केला म्हणून त्याचे आभार मानले
प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे, ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, विचार मंचावर उपस्थित होते. यावेळी आशा निशिकांत नेमाडे, जगदीश रामकृष्ण चौधरी, मनीषा दिनकर भंगाळे, सोनाली दत्तात्रय साळुंखे, जया हंबीरराव देशमुख, इरफान तडवी, रेखा संतोष खारे, सोनाली सूर्यकांत कोठावदे, तुषार केशवराव सोनवणे, केशव पंडित पाटील, जयश्री कुलकर्णी, नीता कापडणे, प्रमोद केळकर, अरुणा सुधीर नेहेते, किशोर नासिकेत नरवाडे, वंदना नामदेव लोखंडे, या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यात IBN लोकमतचे रिपोटर नितीन नांदूरकर, देशोत्तींचे उपसंपादक सुनील भावसार, लोकमतचे प्रसाद धर्माधिकारी, सकाळचे रमेश शर्मा, लोकसत्ता’चे सुनिल महाजन, क्राईम रिपोर्टर चंदन पाटील या सर्व पत्रकारांचा सुद्दा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमसाठी नशिराबाद शहराध्यक्ष जितेंद्र बराटे, शहर सचिव गोकुळ धनगर, सचिन भालेराव, गजेंद्र माळी, लक्ष्मण तायडे, समाधान केदार, संजय कोळी, तेजस कोळी, आदि सर्व महाराष्ट्र सैनिकांनी सहकार्य केले.