जळगाव (प्रतिनिधी) येथील इक़रा शिक्षण संस्थाव्दारा संचलित एच जे थींम महाविद्यालयाच्या वतीने मराठी संवर्धन पंधरवाडानिमित्त कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश कांबळे यांचे ‘मराठी भाषा -दशा व दिशा ‘ विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ राजेश भामरे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. राजु गवरे यांनी व्यक्त केले. आपल्या व्याख्यानात डॉ. प्रकाश कांबळे म्हटले की, भाषेत शक्ति असते. प्रभावी भाषेव्दारे आपण उन्नति करू शकतो. कोणतीही भाषा, बोली शुद्ध अशुद्ध नसते. आतापर्यंत प्रस्थापितांव्दारा बहुजनांची भाषेची उपेक्षा करण्यात आली. बहुजनांनी लिहिते व्हावे. भविष्यात नवीन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय प्रादेशिक भाषा माध्यम भाषा म्हणुन प्रचलित झाल्यास भारतीय भाषा व मराठीचे भविष्य उज्ज्वल आहे. विद्यार्थ्यानी लेखन, वाचन, श्रवण व भाषण कौशल्य विकसित करून व्यक्तिमत्त्व विकसित करावे.
कार्यक्रमात एसएनडीटी महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सतीश जाधव, डॉ. सुंगधा पाटील, प्रा. रेखा देवकर, डॉ. चांद खान, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. इरफान शेख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रभारी प्राचार्य प्रा आय एम पिंजारी यांचे मार्गदर्शन लाभले.