रावेर (प्रतिनिधी) माझ्याकडे मुलबाळ होण्यासाठी खात्रीलायक आयुर्वेदीक औषधी असल्याची थाप मारून एकाची तब्बल ६ लाख ६९ हजारात फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील एकाविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील एका व्यक्तीला डॉ.राहुल पाटील उर्फ योगेश गोसावी (रा. भोकरदन जि. जालना) याने माझ्याकडे मुलबाळ होण्यासाठी खात्रीलायक आयुर्वेदीक औषध असून या औषधमुळे तुमच्या पत्नीला मुलबाळ होईल, असे बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर औषधी देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून वेळेवेळी तब्बल ६ लाख ६९ हजार रुपये उकळले. या प्रकरणी भादवी कलम ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. ईश्वर चव्हाण हे करीत आहेत.