जळगाव (प्रतिनिधी) हुंडा म्हणून कबूल केलेली रक्कम व सोने न आणल्याने भाग्यश्री प्रणेश ठाकूर (वय २९) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ करीत तिला गळा दाबून मारुन टाकण्याची धमकी देण्यात आली.
हा प्रकार सन २०२२ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र तायडे करीत आहेत.