TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘गोलाणी’तील तळमजल्यात साचणार्‍या पाण्यासह दुर्गंधीची महापौर जयश्री महाजन यांच्याकडून गंभीरपणे दखल

‘मनपा’ आरोग्य अधिकारी, कर्मचार्‍यांना सांडपाण्याचा निचरा, स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती व्यापारी संकुल म्हणून गणल्या जाणार्‍या व महापालिकेच्या सतरा मजली इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात नेहमीच साचणारे तळे, सांडपाण्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि ठिकठिकाणी साचणारे कचरा, फुले, भाजीपाल्याच्या घाणीचे ढीग ही बाब तेथील गाळेधारकांसह व्यावसायिक, नागरिकांसाठी नेहमीचीच डोकेदुखी बनलेली आहे. यासंदर्भात संबंधितांकडून वारंवार तक्रारीही केल्या जातात. मात्र, हा प्रश्न कायमच आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी, दि. १८ जून २०२१ रोजी वृत्तपत्रांनीही वृत्त प्रसिद्ध केले. त्याची महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी गंभीरपणे दखल घेऊन महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा ताफा गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात नेऊन सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिला.

त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांकडून यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेत तत्काळ सांडपाण्याचा निचरा करून साचलेले कचर्‍याचे ढीग उचलून चोकअप झालेले चेंबर उघडून तेथील पाणी प्रवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तेथे आणलेल्या व्हॅक्यूम क्लिनर व्हॅनसह यंत्रणेच्या सहाय्याने संपूर्ण चोकअप चेंबर उघडून त्यात जीव धोक्यात घालत कर्मचारी उतरून पाण्याचा निचरा करण्यासह तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला. दरम्यान, या गंभीर समस्येसंदर्भात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पुन्हा सायंकाळी आपल्या दालनात आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक बोलावून गोलाणी मार्केटमधील विविध प्रश्नांसंदर्भात कुठलीही कारणे न सांगता तेथील समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासंदर्भात तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

महापालिका आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त पवन पाटील, प्रभाग समिती क्र. १ चे अधिकारी व्ही.ओ. सोनवणे, आरोग्य निरीक्षक कांबळे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले वृत्त सकाळीच वाचले अन् महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना सोबत घेऊन गोलाणी मार्केटमधील तळमजला गाठला. तेथील साचलेणे सांडपाणी, कुजक्या भाजीपाला, फुलांच्या साचलेल्या घाणीचे ढीग आणि चोकअप झालेले चेंबर या स्थितीमुळे निर्माण झालेली दुर्गंधी पाहून संतप्त स्वरात साचलेले सांडपाणी काढून घाणीचे ढीग तत्काळ उचला. चोकअप झालेले चेंबर उघडून संपूर्ण पाण्याचा निचरा करा, काहीही घाण ठेवू नका, अशा संबंधितांना सूचना केल्या. त्यानंतर कर्मचारी जीव धोक्यात घालत चेंबर उघडून खाली उतरले व त्यांनी २ रिड्युस पाईप टाकून सांडपाणी प्रवाही केले.

दरम्यान, सायंकाळी पुन्हा आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचार्‍यांना महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह आपल्या दालनात बैठकीसाठी बोलावून गोलाणी मार्केटमधील विविध समस्या या वर्षानुवर्षे कायमच आहेत. त्यामुळे त्यावर नुसतेच तात्पुरते उपाय न योजता सर्व समस्या कायमस्वरूपी निकाली काढा. यापुढे कुठलीही कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत. तत्काळ उपाय शोधून कायमस्वरूपी ते अमलात आणण्याचे आदेश दिले. यापुढे गोलाणीच नव्हे, तर कोणत्याही व्यापारी संकुलातील अस्वच्छतेचा प्रश्न खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबीही यावेळी महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी संबंधितांना दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे खा. राहुल गांधी यांचा जन्मदिवस 'संकल्प दिन' म्हणून साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग : चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह दोघांना अटक !

September 19, 2020

बापरे ! बँकेतील कर्मचाऱ्याची कारकुनी चूक अन् १.५ कोटी चुकीने झाले ट्रान्सफर

May 14, 2022

राज्यासह जळगाव जिल्हात धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन ; E-Pos मशीन शासनाकडे करणार परत !

August 5, 2024

गुन्हे निकाली काढण्यासाठी टाळाटाळ, दोन पोलिसांविरुद्धच गुन्हे दाखल ; पोलिस अधीक्षकांच्या कारवाईनंतर खळबळ !

June 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group