जळगाव (प्रतिनिधी) नवी दिल्ली येथे राजपथावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या पथसंचलनात एनसीसीच्या मुलींच्या ग्रुपची परेड कमांडर म्हणून महाराष्ट्राला प्रथम मान मिळवून देणाऱ्या जळगावची सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी संतचे शनिवारी जळगावात आगमन झाले. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी शिवतीर्थ मैदानावर पुष्पहार आणि गुच्छ देऊन स्वागत केले. महापौर, समृद्धी संत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले.
राजपथावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या पथसंचलनात एनसीसीच्या मुलींच्या ग्रुपची परेड कमांडर म्हणून महाराष्ट्राला प्रथम मान मिळवून देणाऱ्या जळगावची सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी संतमुळे जळगावच्या शिरपेचात पुन्हा एकदा तुरा रोवला गेला आहे. रेल्वेस्थानकापासून काढण्यात आलेल्या रॅलीचा शिवतीर्थ मैदानावर समारोप करण्यात आला. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते.